स्वतःचा पक्ष सांभाळा, नंतर अपक्ष आमदार बघा ; सोमय्यांनी शिवसेनेला डिवचलं

राऊतांचे बोलविता धनी मुख्यमंत्री ठाकरे आहेत.
Uddhav Thackeray, Kirit Somaiya
Uddhav Thackeray, Kirit Somaiyasarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पुन्हा आज टीका केली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे कोकणातील बंगले आणि राऊतांची संपत्ती याबाबत सोमय्यांनी भाष्य केलं. ते पत्रकारांशी बोलत होते. (Kirit Somaiya latest news)

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्याबाबत केलेली वक्तव्ये ही सकृतदर्शनी मानहानीकारक असल्याचे निरीक्षण नुकतेच शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आदेशात नोंदवले आहे. सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीवर कायदेशीर कार्यवाही (प्रोसेस) सुरू होण्याच्या दृष्टीने राऊत यांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायमूर्ती पी. आय. मोकाशी यांनी दिले आहेत.

सोमय्या म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मार्फेत मेधा सोमय्या,नील सोमय्या, गुणवंती सोमय्या यांना जेलमध्ये पाठविण्याचे विधान केलं होतं. राऊतांच्या या विधानाला कोर्टानं थांबवलं आहे,"

Uddhav Thackeray, Kirit Somaiya
गृहमंत्र्याच्या नावानं पुण्यातील महिलेला दहा लाखांचा गंडा

"संजय राऊत यांचे मी घोटाळे बाहेर काढल्याने त्यांची १४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. संजय राऊत ढोंगी आहेत, त्यांनी कुठलीही तक्रार केलेली नाही. राऊतांचे बोलविता धनी मुख्यमंत्री ठाकरे आहेत. दोघांना हिशेब द्यावा लागणार आहे," असे राऊत म्हणाले.

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. "स्वतःचा पक्ष सांभाळा नंतर अपक्ष आमदार बघा, राज्यसभा निवडणुकीत ठाकरे सरकारचं नाक कापलं," असे सोमय्या म्हणाले. "विधानपरिषद निवडणुकीत आमदारांनी यांचे कपडे उतरवू नयेत," असा टोला सोमय्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com