Mumbai News, 10 August : राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना ही केवळ विधानसभा निवडणुकीसाठीचा जुमला असून, त्यानंतर ही योजना बंद पडणार असल्याचा दावा विरोधकांकडून सतत केला जातो. तर विरोधकांचा हा दावा महायुतीतील नेत्यांकडून खोडून काढला जातो.
अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील लाडकी बहीण योजना कधीपर्यंत सुरु राहणार याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. आदिवाशी दिनानिमित्त आदिवासी पाड्यात जाऊन संवाद साधताना त्यांनी या योजनेबद्दल वक्तव्य केलं.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "17 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हफ्ते जमा होतील. मी जो शब्द दिला, म्हणजे दिला आणि शब्द दिल्यावर मी शांत बसत नाही. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. ते म्हणताय ही योजना सुरु राहणार नाही. त्यामुळे या लाडक्या भावांपासून (विरोधकांपासून) सावधान रहा."
लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) कायम राहणार आहे. जेव्हापासून आम्ही योजना राबवली तेव्हापासूनच विरोधकांना पोटदुखी झाली. मी ज्या ठिकाणी दौऱ्याला जातो, तिथे माझ्या लाडक्या बहिणी मला राखी देखील बांधतात. याला देखील नशीब लागतं. माझी एकच सख्खी बहिण होती पण आता महाराष्ट्रात लाखो बहीणी असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
यावेळी त्यांनी विरोधक या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू नये यासाठी संभ्रम निर्माण करत असल्याची टीका केली. लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय झाली आहे. मात्र, या योजनेचे लाभ तुम्हाला मिळू नये, यासाठी अनेक सावत्र भाऊ संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या सख्या भावावर विश्वास ठेवा, आवाहनही त्यांनी शिंदेंनी केलं.
आपण आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही ते यावेळी म्हणाले. शिवाय जात-पात न पाहता सर्व माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याचं सांगितल्यामुळे आता यावर विरोधक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.