दरेकरांचा पाय खोलात; मजूर म्हणून 25 हजार रुपयांचा मोबदला घेणं पडणार महागात

विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अडचणीत आले आहेत.
Pravin Darekar News
Pravin Darekar NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अडचणीत आले आहेत. दरेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यांनी कामगार सहकारी संस्थेकडून घेतलेल्या 25 हजार रुपयांच्या मोबदल्याचा मुद्दा न्यायालयीन सुनावणीत उपस्थित झाला आहे. यामुळे दरेकरांना हे पैसै महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Pravin Darekar News)

मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा न मिळाल्याने दरेकरांना अटक होण्याची शक्यता आहे. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची दरेकर यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर दरेकरांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर आज सुनावणी सुरू आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pravin Darekar News
मोदी सरकारचा पद्मभूषण हाती पडताच आझादांनी काँग्रेसवर डागली तोफ!

प्रवीण दरेकर यांनी कामगार असल्याचे सांगून कामगार सहकारी संस्थेकडून 25 हजार रुपये मोबदला घेतला, असे मुंबई पोलिसांनी आज न्यायालयासमोर सांगितले. दरेकर यांनी गेल्या आठवड्यात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. पोलिसांनी विशेष सरकारी वकिलांमार्फत आज त्यांच्या जामीन अर्जावर म्हणणे मांडले. कामगार सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी मजूर असल्याचा खोटा दावा दरेकरांनी केला. दरेकर यांच्याकडे उपजीविकेचे अन्य साधन असतानाही त्यांनी मजूर असल्याचा खोटा दावा केला. या आधारे ते मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होण्यासाठी रिंगणात उतरले आणि त्यांना चार लाखांहून अधिक मानधन मिळवले, असे वकिलांनी म्हटले आहे.

Pravin Darekar News
निवडणुकानंतर जनतेला शॉक! पेट्रोल, डिझेल महागलं अन् एलपीजी 50 रुपयांनी वाढला

कामगार असल्याचा दावा करून दरेकर हे 1999 मध्ये कामगार सहकारी संस्थेचे सदस्य झाले. त्यांनी 2016 मध्ये विधान परिषद निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 2.3 कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यांच्याकडे 2.5 लाख रुपयांच्या मासिक उत्पन्नासह 91 लाख रुपयांची रोकड होती. यावरून ते मजूर नसल्याचे दिसून येते, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com