Assembly Election 2024 : लोकसभेचा पराभव भाजपच्या जिव्हारी, काम न केलेल्या आमदारांबाबत विधानसभेआधी घेणार मोठा निर्णय!

Bjp Maharashtra News : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 23 जागांवर यश मिळालं होतं. पण, 2024 मध्ये भाजपचा आलेख उतरता दिसला.
BJP core committee maharashtra.jpg
BJP core committee maharashtra.jpgsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपनं '45 पार'चा नारा दिला होता. पण, हा भ्रमाचा भोपळा लोकसभेचा निकाल आल्यानंतर फुटला. महायुतीला अवघ्या '17' जागांवर समाधान मानावं लागलं. तर, भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या आहेत.

यातच लोकसभेनंतर विधानसभेचं 'लक्ष्य' ठेवून भाजपनं ( Bjp ) कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत काम न केलेल्या किंवा ज्या मतदारसंघातून पुरेसे मताधिक्य न मिळालेल्या आमदारांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे.

भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक गुरूवारी प्रदेश कार्यालयात रात्री उशिरापर्यंत झाली. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्यासह वरिष्ठ नेते चार-पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीस उपस्थित होते.

BJP core committee maharashtra.jpg
Anil Deshmukh : अनिल देशमुखांना हवी राज्य शासनाकडून 'क्लिन चिट'

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 23 जागांवर यश मिळालं होतं. पण, 2024 मध्ये भाजपचा आलेख उतरता दिसला. केंद्रीय मंत्र्यांसह बड्या नेत्यांना महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) उमेदवारांनी लोकसभेलेला पाणी पाजलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काम न केलेल्या किंवा ज्या मतदासंघात पुरेसे मताधिक्य मिळालेले नाही, अशा आमदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याचा भाजपचा विचार आहे.

BJP core committee maharashtra.jpg
Eknath Shinde News : शिवसेना शिंदे गटाचा प्लॅन ठरला; 100 मतदारसंघात प्रभारी, निरीक्षक नेमणार

त्यासह महायुतीतील भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) या पक्षांकडे असलेल्या विद्यमान आमदारांच्या जागा शक्यतो, त्याच पक्षांकडे कायम ठेवण्याचं सूत्र ठेवून वरिष्ठ नेत्यांनी जागावाटपाच्या चर्चेस सुरूवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com