Sahar Shaikh Controversy : 'मुंब्य्रा'वरुन राजकारण पेटलं असताना भाजप मंत्र्यांकडूनच 'MIM'च्या सहर शेखची पाठराखण; राणा, सोमय्या, राणेंना फटकारलं

Sahar Shaikh News: एकीकडे सहर शेख यांच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणे,माजी खासदार नवनीत राणा आणि किरीट सोमय्या यांनी संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती. पण आता चक्क भाजपच्या मंत्र्यांनीच एमआयएमच्या सहर शेखची पाठराखण केल्याचं समोर येत आहे.तसेच त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवरही स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
Sahar-Shaikh BJP
Sahar-Shaikh BJP Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच महापालिका निवडणुका पार पडल्या. या निकालात काही धक्कादायक निकालही लागले. याचदरम्यान,ठाणे महानगरपालिकेतील मुंब्राचं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंब्रातील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी विजयी सभेत पुढच्या पाच वर्षांत आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाचा करायचा आहे, असं विधान केलं. या त्यांच्या विधानानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकारण तापलं आहे.

एकीकडे सहर शेख यांच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणे,माजी खासदार नवनीत राणा आणि किरीट सोमय्या यांनी संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती. पण आता चक्क भाजपच्या मंत्र्यांनीच एमआयएमच्या सहर शेखची पाठराखण केल्याचं समोर येत आहे.तसेच त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवरही स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

राज्याचे वनमंत्री व भाजप नेते तथा गणेश नाईक यांनी सोमवारी (ता.26) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका व तरुण आक्रमक चेहरा अशी ओळख बनलेल्या आपल्या सरकारमधील मंत्री आणि महायुतीच्या नेत्यांनाच फटकारल्याचं दिसून येत आहे.

गणेश नाईक (Ganesh Naik) म्हणाले,सहर शेख यांच्या एमआयएम पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा असून आपण त्याचे किती भांडवल करायचे असेल ते करू शकतो.मात्र,आपणही भगवामय करून टाकू असं म्हणू शकतो. रोखठोक भूमिका मांडत थेच भाजपचा हिंदुत्त्ववादी चेहरा असलेल्या किरीट सोमय्या, नितेश राणे, नवनीत राणा यांच्यासह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसह एकूण महायुतीच्या नेत्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केलं आहे.

Sahar-Shaikh BJP
जवाहरलाल नेहरूंनी पहिल्या प्रजासत्ताक दिनी कोणाला दिले होते आमंत्रण? 99% भारतीयांना आजही ठाऊक नाही हा इतिहास!

मंत्री गणेश नाईक यांनी यावेळी महायुतीच्या नेत्यांनाही घरचा आहेर देतानाच इम्तियाज जलील यांच्या भूमिकेलाही तुम्ही कायदेशीररित्या आव्हान देऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या तिरंग्यातही हिरवा रंग असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. यावेळी एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही पेटलेल्या राजकारणात उडी घेत मुंब्य्रात सहर शेखसह नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेऊन पक्षाची भूमिका मांडली होती. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केवळ मुंब्राच नाही तर अवघा महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू असे म्हटलं होतं.

घेऊन पक्षाची भूमिका मांडली होती. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केवळ मुंब्राच नाही तर अवघा महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू असे म्हटलं होतं. पालघरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलताना राजकारण करायचं असेल तर जाती धर्माच्या भिंती टाकून राजकारण करू नका,असं राजकीय नेत्यांना गणेश नाईक यांनी पालघरमध्ये सुनावलं आहे. मी जात-धर्म कधी पाळला नाही म्हणून लोक माझ्यामागे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Sahar-Shaikh BJP
Pankaja Munde And Babanrao Lonikar : मंत्री मुंडे 'पालक', पण बबनरावांचा 'प्रशासकीय डाव'; जिल्हाधिकाऱ्यांविरोधात हक्कभंगाची तयारी...

तर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार पलटवार केला.ते म्हणाले,तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्या महाराष्ट्राला हिरवा करू शकणार नाहीत," असा हल्लाबोल राणा यांनी इम्तियाज जलील यांच्यावर केला आहे.

याचवेळी त्यांनी तसेच आम्ही तुम्हाला या देशात अल्पसंख्याक म्हणून राहू दिले याचा अर्थ असा नाही की, आम्ही गप्प बसू. गरज पडल्यास आम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी 15 सेकंदही पुरेसे आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आमच्या शरीरात आजही छत्रपतींच्या पुत्रांचे आणि भक्तांचे रक्त वाहते. हा महाराष्ट्र कधीही हिरवा होणार कामाचा अनुभव आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com