Shinde Vs BJP : राज्यात शिंदे गट व भाजप यांनी मिळून सत्ता मिळविली आहे. असे असले तरी शिंदे गट व भाजप यांच्यातच खटके उडू लागले आहेत. याचा प्रत्यय आज विधानसभेत आला. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या ताब्यात असलेल्या ठाणे महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. ही टीकाच आता राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.
आमदार संजय केळकर म्हणाले की, आमच दुखणं वेगळं आहे ते सांगता ही येत नाही आणि दाखवता ही येत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, काही अधिकाऱ्यांच्यामुळे ठाण्यात अनाधिकृत बांधकामाचे जाळ सुरु आहे. हे अधिकारी या अनाधिकृत बांधकामात पर स्क्वेअर फुटांप्रमाणे पैसे घेतात. या संदर्भात अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दिल्या आहेत मात्र कोणतीही कारवाई होत नाही, असे त्यांनी सांगितले
.या अधिकारी यांना महत्वाच्या जबाबदारी देऊन त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जात असताना हे अधिकारी सरकारचे जावई आहेत का? त्यामुळे या अधिकारी यांच्या समोर महापालिका आयुक्त हतबल असल्याची संजय केळकर यांची टीका केली.
महेश अहिरे या अधिकाऱ्यांची बोगस डीग्री असताना ही त्यांना अनेक महत्वाच्या ठिकाणी बसविण्यात आले आहे. हे अधिकारी सुपारी घेऊन काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. महेश अहिर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.