Ganpat Gaikwad Case : जखमी महेश गायकवाडला बघण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंची रुग्णालयात धाव

BJP MLA allegedly shooting Shiv Sena (Shinde) Leader : गोळीबाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल...
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News Thane :

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शिवसेना (शिंदे गट) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार राहुल पाटील हे दोघे जखमी झाले आहेत. त्या दोघांवर ठाण्यातील जुपिटर रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गायकवाड यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री Eknath Shinde हे ठाण्यात जुपिटर रुग्णालयात पोहोचले आहेत.

Eknath Shinde
Ganpat Gaikwad Firing : शरद पवारांनी शिंदे सरकारच्या कारभाराचे काढले वाभाडे; म्हणाले, "कायदा हातात घेणाऱ्यांबद्दल..."

गोळीबार झाल्यानंतर रात्रीच गायकवाड आणि पाटील या दोघांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यावेळी गायकवाड यांना रुग्णालयात आणले. त्यावेळी रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शनिवारी सकाळपासून गायकवाड यांची विचारपूस करण्यासाठी पुन्हा एकदा कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आणि माजी आमदार रवींद्र पाठक यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान रुग्णालय प्रशासनाने गायकवाड यांची प्रकृती सध्या गंभीर तर पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.

Eknath Shinde
Ganpat Gaikwad Firing : सत्तेचा माज, बंदुकीचा वापर...कुठे आणून ठेवलाय महाराष्ट्र माझा? गोळीबारानंतर वडेट्टीवारांचा संताप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com