ठाणे : राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी किरण गोसावी (Kiran Gosavi) हा भाजप आमदाराच्या पत्नीच्या कंपनीत संचालक असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. आता या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. भाजपचे (BJP) आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी हे सत्य समोर आणले आहे. डावखरे यांनी मायक्रोबायॉलॉजिस्ट’ असलेल्या किरण गोसावी यांना पत्रकार परिषदेत समोर आणले. यानंतर किरण गोसावी यांनी तो मी नव्हेच असे म्हणत सर्व आरोप खोडून काढले.
भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी नीलिमा डावखरे आणि किरण गोसावी एका कंपनीत संचालक असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मंत्री नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर हे फोटो व्हायरल झाले होते. अखेर यात डोंगर पोखरून उंदीर काढला, अशी परिस्थिती निर्माण झाली. मलिक यांनी सांगितलेला किरण गोसावीच दुसराच असल्याचे आज डावखरे यांनी सिद्ध करून दाखवले.
मित्र परिवाराने आणलेला गांजा पिऊन व खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नये, असा टोला आमदार डावखरे यांनी मलिक यांना मारला. ट्र्यू पॅथलॅबचे संचालक असलेले किरण प्रकाश गोसावी यांचे नामसाधर्म्य आढळल्यानंतर हा बदनामी करण्याचा कट शिजला होता, असा आरोपही आमदार डावखरे यांनी केला. केवळ 400-450 रुपये भरून सविस्तर माहिती घेण्याऐवजी शहानिशा न करता आरोप केले, अशी टीका डावखरेंनी केली.
या वेळी बोलताना ट्र्यू पॅथलॅबचे संचालक किरण गोसावी म्हणाले की, 7 ऑक्टोबरला पुणे पोलिसांनी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांना मी माझी कागदपत्रे व पासपोर्ट दाखविला होता. केवळ नावात सारखेपणा असल्यामुळे मला नाहक त्रास सहन करावा लागला होता.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच, दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणीही करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार डावखरे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.