परमबीरसिंहांचा पाय खोलात; कधीही होऊ शकते अटक!

अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह आता चांगलेच अडचणीत आले आहेत.
Param Bir Singh
Param Bir Singh File Photo
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) आता चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांना आता कधीही अटक होऊ शकते. कारण न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. या वॉरंटने सिंहचा पाय आणखीनच खोलात गेल्याचे दिसत आहे. याच आठवड्यात सिंह यांना बजावलेले हे दुसरे वॉरटं आहे.

मुंबईतील एस्पेलेनेड न्यायालयाने खंडणी प्रकरणात परमबीरसिंह यांच्यासह तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. परमबीरसिंह यांच्यासोबतच विनयसिंह आणि रियाज भाटी यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. परमबीरसिंह हे सापडत नसून गुन्हे शाखा त्यांचा शोध घेत आहे. गुन्हे शाखेकडून परमबीरसिंह यांच्या विरोधात दाखल प्रकरणाचा तपास सुरू आहे. याच प्रकरणात छोटा शकीलचा हस्तक रियाज भाटी हासुद्धा आरोपी आहे . सध्या तो फरार आहे.

परमबीरसिंह यांच्यासह तिघांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावावा, अशी मागणी करणारा अर्ज गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केला होता. यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. परमबीरससिंह यांच्या विरोधात याच आठवड्यात दोन वॉरंट बजावण्यात आली आहेत. ठाण्यातील न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणात 26 ऑक्टोबरला परमबीरसिंह यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

परमबीरसिंह यांच्यावर आतापर्यंत अनेक गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यातील ३ गुन्हे वसुलीचे तर १ गुन्हा अॅट्रोसिटीचा आहे. या प्रकरणांमध्ये परमबीरसिंग अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीसही यापूर्वी काढण्यात आली होती. ते परदेशात पळून गेल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अखेर मुंबई पोलिसांनी दरवाजा ठोठावला होता. त्यावर आज त्यांना वॉरंट बजावण्यात आला आहे.

Param Bir Singh
काँग्रेसमध्येच राहण्याच्या मुद्द्यावर कॅप्टन अमरिंदरसिंगांचा मोठा खुलासा

मुंबईच्या आयुक्तपदावरून गृहरक्षक दलामध्ये उचलबांगडी केल्यानंतर परमबीरसिंह यांनी 20 मार्चला लेटर बॉम्ब टाकून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारला अडचणीत आणले होते. परमबीर सिंग हे गृहरक्षक दलाचे महासंचालक आहेत. मात्र, अनेक महिने ते गैरहजर राहिल्याने कोषागार कार्यालयाने विचारणा केली होती. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात परमबीर सिंह आठ दिवसांची रजा घेऊन चंडीगडला त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर तिथूनच ते आजारपणाची रजा दर 15 दिवसांनी वाढवत राहिले.

Param Bir Singh
पेट्रोलच्या दरवाढीवर 'हा' उपाय केल्यास मिळेल आराम!

गृह विभागाने परमबीरसिंह यांच्याविरोधात राज्य सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्याचा पहिला भाग म्हणून परमबीरसिंह यांचे वेतन रोखण्यात आलं आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी राज्य सरकारने केली असल्याचे समजते. त्यामुळे परमबीरसिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गृहविभाग आता या सर्व प्रकाराचा तपास करीत आहेत. परमबीरसिंह यांची विभागीय चौकशी सुरू आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांचं वेतन रोखण्याबाबतचे पत्र गृहविभागाने महासंचालकांना पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com