विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या 'हिंदुस्थानी भाऊ'ला जामीन मंजूर

धारावीतील हिंसक आंदोलन प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. बांद्रा महानगर दंडाधिकारी कोर्टाने हिंदुस्तान भाऊचा जामीन अर्ज फेटाळला होता.
Hindustani Bhau Granted Bail
Hindustani Bhau Granted Bailsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन (Online examination) घेण्यात यावी, या मागणीसाठी काही दिवसापूर्वी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केले होते. या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau)उर्फ विकास पाठक याला अटक करण्यात आली होती. त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात यावी, या मागणीसाठी हिंदुस्थानी भाऊने विद्यार्थ्यांना भडवले असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्या सांगण्यावरुन विद्यार्थ्यांनी नागपूर, मुंबई येथे आंदोलन केले होते. त्याला अटक करण्यात आली होती. (Hindustani Bhau Granted Bail)

त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी हिंदुस्थानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हिंदुस्थानी भाऊच्या वतीने ऍड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला होता.

धारावीतील हिंसक आंदोलन प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. बांद्रा महानगर दंडाधिकारी कोर्टाने हिंदुस्तान भाऊचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली होती.

सेशन्स कोर्टाकडून त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. ३० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेसह एक किंवा दोन हमीदार देण्याच्या अटीवर सेशन्स कोर्टाने भाऊला जामीन मंजूर केला आहे.

Hindustani Bhau Granted Bail
राऊतांचे नवं टि्वट ; चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है..

मुंबईसह नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे याठिकाणी बोर्डाची ऑफलाईन परीक्षा रद्द करावी यासाठी ३१ जानेवारी रोजी 'हिंदुस्थानी भाऊ' मुळेमोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.

मुंबईत धारावीत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर नागपूरमध्ये बसची तोडफोड केल्याचंही समोर आलं. 'हिंदुस्थानी भाऊ'च्या आवाहनानंतर ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलनात उतरलो, असं मुंबईत जमलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com