

Mumbai News : पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी करण्यासाठी ते एक-एक शिलेदार जमवत आहेत. त्यातच त्यांनी आता मुंबईत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. उत्तर-मध्य मुंबईतील भाजपचे सचिव सुधीर खातू यांनी रविवारी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
सुधीर खातू यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, राजकारणात नेते विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जात असतात. मात्र, खातू हे सत्ताधारी पक्षातून देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षात आले आहेत, असे सांगत त्यांनी भाजपला (BJP) जोरदार टोला लगावला. राजकारणात साधारणता पक्षप्रवेशाचा प्रवाह विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे असतो. सुधीर खातू यांनी हा प्रवाह उलटा फिरवला. खातू हे सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात आले, असे मी म्हणणार नाही.
त्यांनी सत्ताधारी पक्षातून देशप्रेमी, हिंदुत्ववादी पक्षाकडे (ठाकरे गट) प्रवाह सुरू केला आहे. राज्यामध्ये हिंदू, मराठी आणि जे जे लोकशाही प्रेमी आहेत, ते एकवटलेच पाहिजेत. आताच नाही तर कधीच नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आताच आपण हुकूमशाहीची वळवळ थांबवली नाही, तर आपल्या भगव्याला काही अर्थ राहणार नाही. आपल्या देशप्रेमाला काही अर्थ राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
तुमच्या हातात भगवा आहे. त्यावर 'मशाल' चिन्ह आहे. मात्र, लक्षात घ्या, भगवा म्हणजे मशाल आहे. हीच मशाल आणि हाच भगवा देशाला तर दिशा दाखवणारा आहेच शिवाय आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचाराला जाळून टाकणार आहे, याची मला खात्री आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.