Prabhakar Shinde : मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या जुन्या शिवसैनिकाकडे! प्रभाकर शिंदे स्थायी समितीचे अध्यक्ष

Mumbai Standing Committee BJP : प्रभाकर शिंदे यांना महापालिकेत काम करण्याचा अनुभव आहे. शिवसेनेत असताना त्यांनी सभागृह नेते म्हणून देखील काम केले आहे.
Prabhakar Shinde
Prabhakar Shindesarkarnama
Published on
Updated on

Prabhakar Shinde : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपने प्रभाकर शिंदे यांच्या नावाला पसंती दिली आहे. ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुळचे शिवसैनिक असलेले शिंदे यांनी शिवसेनेत फूट पडण्याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे स्थायीसाठी त्यांना संधी मिळणार की नाही याविषयी संभ्रम होता. अखेर भाजप पक्षश्रेष्ठींनी शिंदे यांच्या नावाला पसंती दिली.

आज स्थायी समिती तसेच इतर विषय समित्यांसाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर,शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांच्या नावाची निश्चित करण्यात आले आहे.

प्रभाकर शिंदे यांना महापालिकेत काम करण्याचा अनुभव आहे. शिवसेनेत असताना त्यांनी सभागृह नेते म्हणून देखील काम केले आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मकरंद नार्वेकर आणि प्रकाश दरेकर यांच्या देखील नावाची चर्चा होती. मात्र, भाजपने जुने शिवसैनिक असलेल्या प्रभाकर शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला

Prabhakar Shinde
Rohit Pawar Press : 210 कोटींच्या इन्शुरन्ससाठी अजित दादांचं विमान पाडलं? रोहित पवारांच्या गंभीर आरोपाने खळबळ

निष्ठावंत नाराज?

मुंबई महापौरपदी रितू तायडे यांना संधी देण्यात आली. त्यांनी भाजपच्या महिला आघाडीत काम केले आहे. दरम्यान, रितू तायडे या मुळच्या काँग्रेसच्या होत्या. 2014 च्या दरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनतर दोन वेळा त्या भाजपच्या तिकीटीवार नगरसेविका झाल्या.

त्यांना थेट महापौर पदाची आता संधी मिळाली. आता मुळचे शिवसैनिक असलेले प्रभाकर शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना थेट स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले. त्यामुळे बाहेरील पक्षातून येणाऱ्यांना मोठी पद मिळतात मात्र मुळ भाजपच्या नगरसेवकांना संधी मिळत नसल्याची नाराजी निष्ठवंतांमध्ये निर्माण होईल, अशी चर्चा आहे.

Prabhakar Shinde
Dharashiv Zilla Parishad politics : सत्ता स्थापनेचा मॅजिक आकडा जुळला? भाजपचं ठरलं; धाराशिव झेडपीत शिंदे शिवसेना सत्ताबाहेर?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com