मुंबईची काळजी करु नका, शिवसेनेचे तुकडे होताहेत, ते पाहा ; दरेकरांनी राऊतांना सुनावलं

शिवसेनेचे हायकमांड हे मातोश्रीवर आहे, आम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी दिल्लीत जावे लागत नाही.
Pravin Darekar, Sanjay Raut
Pravin Darekar, Sanjay Raut sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडली आहे. पण आता ठाकरे कुटुंबीयांनी पक्ष वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. (Pravin Darekar news update)

संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची शिवसेनेशी भाजपने युती केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)यांनी टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

दरेकर म्हणाले, "शिवसेना मुळापासून संपविण्यासाठी संजय राऊत अशा प्रकारची व्यक्तव्य करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. शिवसेनेचे तुकडे होत आहे, याकडे राऊतांनी बघावे, मुंबईची काळजी करु नये, मुंबईला कुणी हिरावून घेणार नाही,"

"संजय राऊतांच्या आरोपांना गंभीर घेण्याची गरज नाही.राऊतांचे विधानाला शून्य किंमत आहे. भाजप हा खूप मोठा पक्ष आहे. भाजपचा हात पकडून शिवसेना मोठी झाली आहे," असे दरेकर म्हणाले.

Pravin Darekar, Sanjay Raut
Municipal Elections : आघाडीसोबत राहायचे का ? ; अजितदादा म्हणाले..

"बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले मुख्यमंत्री झाले आहेत, तसेच जे आमदार शिंदे गटात आले आहेत ते देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झाले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांना नक्कीच समाधान लाभेल," असे दरेकर म्हणाले.

"शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीत जात नाही, एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे. मुंबईचे तुकडे करण्याचा भाजपचा विचार लपून राहिलेला नाही, त्या दृष्टीने त्यांनी काम सुरू आहे. शिवसेनेचे हायकमांड हे मातोश्रीवर आहे, आम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी दिल्लीत जावे लागत नाही," असे शिंदे यांनी नाशिक येथे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com