मलिक, चिंता करु नका, भलेबुरे ओळखण्यास महिला समर्थ ; हिजाबवरुन भाजपचा टोला

''महिलांवर स्वतःची मते लादणारे असे सर्व नेते, तालिबानी प्रवृत्तीपेक्षा अजिबात वेगळे नाहीत,'' अशी टीका शीतल देसाई यांनी केली आहे.
Sheetal Desai, Nawab Malik
Sheetal Desai, Nawab Maliksarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कर्नाटक हिजाब प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी राज्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी हिजाबबाबत (hijab) केलेल्या विधानावरुन मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (Sheetal Desai) यांनी टीका केली आहे. ''महिलांवर स्वतःची मते लादणारे असे सर्व नेते, तालिबानी प्रवृत्तीपेक्षा अजिबात वेगळे नाहीत,'' अशी टीका त्यांनी केली आहे.

''ओढणी, हिजाब, घुंघट हे भारतीय महिलांचा दागिने आहेत,'' असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केले आहे. त्यावर देसाई यांनी टीका केली आहे. ''अनेक आखाती देशातही महिलांनी घराबाहेर पडावे की नाही, मोटार चालवावी की नाही हे नियम पुरुष ठरवतात. त्याच मनोवृत्तीतील ही विधाने आहेत.

Sheetal Desai, Nawab Malik
योगींचे अर्धा डझन मंत्री, अन् राजकीय वारसदारांमध्ये आज लढत

महिलांच्या वतीने बोलण्याचा मलिक यांना काहीही अधिकार नाही. त्यांना बुरखा, हिजाब यांची स्तुती करायची असल्याने त्यांनी विनाकारण दागिन्याची उपमा दिली आहे. त्यांना महिलांच्या स्वातंत्र्याची काहीही चिंता नसून त्यांना फक्त निवडणुकीत मतांसाठी हिजाब-बुरखा यांचे समर्थन करायचे आहे. महिलांना चूल आणि मूल एवढ्याच कार्यक्षेत्रात ढकलणारी ही इतिहासकालीन मनोवृत्ती आहे,'' अशी टीकाही देसाई यांनी केली आहे.

देसाई म्हणाल्या, ''आज भारतीय स्त्रीया आपले भलेबुरे ओळखण्यास समर्थ असल्याने त्यांची चिंता मलिक यांनी करू नये. उलट आज महाविकास आघाडीच्या राज्यात भ्रष्टाचार, गुंडगिरी यांची बजबजपुरी झाल्याचे त्यांनी ध्यानी घ्यावे, असा टोलाही देसाई यांनी लगावला.

Sheetal Desai, Nawab Malik
सुपर स्प्रेडर? महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी चुप्पी साधणं हेच महाराष्ट्र प्रेम?

हिजाब, बिकिनी, घुंघट, जीन्स यांचे प्रियंका गांधी यांनीही समर्थन केले होते. त्यावर देसाई यांनी टीका केली आहे. ओढणी, हिजाब, घुंघट घ्यावे का, हे महिलांचे स्वातंत्र्य आहे असे एकीकडे म्हणायचे आणि एकीकडे या विशिष्ठ वस्त्रांची स्तुती करायची हा दुटप्पी प्रकार आहे. अशी खोटी स्तुती करून ही वस्त्रे परिधान करण्यासाठी ते महिलांवर दडपण आणत आहेत, ही प्रतिगामी विचारसरणी आहे, अशी टीका देसाई यांनी केली आहे. त्याऐवजी महिलांच्या अंगावरील सैन्याचा वा पोलिस गणवेश हाच दागिना आहे, असेच सर्वांनी म्हटले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Sheetal Desai, Nawab Malik
अमरावतीत आमदार रवी राणांसह 11 जणांवर गुन्हा ; आज काम बंद आंदोलन

भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini)यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शाळेत हिजाब घालून येण्याला विरोध केला आहे. ''शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा,'' असं हेमा मालिनी म्हणाल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com