सोमय्यांवरील हल्ला प्रकरणात भाजपनं थेट शहांकडे केली मोठी मागणी

सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या इमारतीत झालेल्या कथित हल्ला प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे.
Kirit Somaiya Attack Case
Kirit Somaiya Attack Casesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुणे महापालिकेच्या (PMC) इमारतीत झालेल्या कथित हल्ला प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. भाजपकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहिलं असून घटनेची माहिती दिली आहे.

सोमय्या हे पाच फेब्रुवारी रोजी नियोजित कार्यक्रमानुसार पुणे महापालिकेत आले होते. पण तिथे शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी झालेल्या गदारोळ सोमय्या खाली पडले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. याबाबतची संपूर्ण माहिती पाटील यांनी शहा यांना पत्राद्वारे दिली आहे. यामध्ये पाटील यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत पुणे पोलिसांवर आरोप केले आहेत.(Kirit Somaiya Attack Case)

Kirit Somaiya Attack Case
अखेर लखीमपूर खीरी हत्याकांडावर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन

पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, पुणे दौऱ्यात सोमय्यांना पोलिसांनी (Police) आवश्यक सुरक्षा पुरवली नाही. सोमय्या यांची मॉब लिंचिंगच्या माध्यमातून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांनी त्यांना वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले, सोमय्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करताना चुकीची कलमं का लावली, असे सवाल पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

सोमय्या हे महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारमधील नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकारकडून पोलिसांचा दुरूपयोग केला जात आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था संपल्याचे हे चिन्ह आहे. केंद्र सरकारने यावर गंभीर कारवाई करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

या घटनेची विस्तृतपणे आणि चोहोबाजूने चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी करत दोषींना शिक्षा द्यावी, अशी मागणी पाटील यांनी शहांकडे केली आहे. या षडयंत्रात सामील असलेल्या पोलिसांवरही कारवाई व्हावी. तसेच महाराष्ट्र सरकारची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि संविधान व कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करावे, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com