

Mumbai News : उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कमलेश निकम यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे.निकम यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधाना केले होते. त्यामुळे निकम यांच्या विरोधात कल्याणमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
कमलेश निकम यांच्या विरोधात भाजप पदाधिकारी प्रशांत माळी, महेंद्र मिरजकर यांनी कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कमलेश निकम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, या तक्रारीची दखल घेत संबंधित प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन बाजारपेठ पोलिसांकडून देण्यात आल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रशांत निकम म्हणाले, रवींद्र चव्हाणसाहेबांबद्दल निकम बोलतो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो बोलत आहे. आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चव्हाणसाहेबांवरील टीका भाजप कार्यकर्ता सहन करणार नाही. निकम स्वतः गुन्हेगार आहे. त्याने लोकांना धमकावले, कंत्राटदारांना त्रास देला, तो जेलमध्येपण जाऊन आलाय. त्याचे काय संस्कार आहे यातून दिसतंय.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकेकाळी मंचेकर टोळीशी संबंधित असल्याचा सणसणाटी आरोप निकम यांनी केला आहे. भाजप नेते कुमार आयलानी उल्हास नदी काठी 'अँटालिया' येथे धनदांडग्या बिल्डरांच्या हितासाठी बेकायदेशीर पर्यटन स्थळ उभारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.