Chandrakant Patil Reply to Raut : राऊतांच्या मोदींवरील टीकेवर भाजपच्या चंद्रकांत पाटलांचा पलटवार;म्हणाले...

BJP Vs Thackeray Group : तुरुंगात जावं लागल्यानं त्यांची....
Chandrakant Patil Reply to Sanjay Raut
Chandrakant Patil Reply to Sanjay RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांची उपरोधित स्तुती करताना भाजपला सवाल केलाय. नरेंद्र मोदी सूर्य, चंद्र आहे, धुमकेतू आहेत. मोदी हे तेजस्वी सूर्य आहेत. हा सगळा प्रकाश मोदींमुळेच पडलाय. एवढंच काय रात्रीचं शीतल चांदणंही त्यांच्यामुळेच आहे अशी उपरोधिक टीका केली होती. या टीकेवर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे.

भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. पाटील म्हणाले,संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही. तुरुंगात जावं लागल्यानं त्यांची पातळी घसरली आहे. हे सामान्य माणसाला आवडत आहे असं नाही. आजही सर्वांनी मोदींना जगातील सर्वात सर्वोच्च नेते म्हणून गौरवलं आहे. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून देश वेगाने प्रगती करत आहे असंही पाटील म्हणाले.

Chandrakant Patil Reply to Sanjay Raut
Indapur Market Committee Election: इंदापुरात आमदार माने, माजी सभापती जगदाळे, फडतरे, भरणेंच्या बंधूंसह मातब्बरांचा शड्डू

मोदींवर टीका म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली. हे जगाला माहिती आहे. अशा माणसावर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्याचा परिणाम सामान्य माणसावर होत नाही. एखादा माणूस कशाचाही परिणाम करून घेत नसेल, तर त्यांनी कितीही शिव्या दिल्या तरी त्याचं समाधान केवळ शिव्या देणाऱ्याला असतं अशी टीका पाटलांनी केली आहे. तसेच या सर्व गोष्टी सर्वसामान्य माणसाला कळतात असंही ते म्हणाले.

Chandrakant Patil Reply to Sanjay Raut
Karnataka Politics : देवेगौडा कुटुंबात 'या' मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन वादाची ठिणगी; पक्षप्रमुखांसोबतची चर्चाही फिस्कटली

संजय राऊत काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूर्य, चंद्र आणि धूमकेतू तर गेल्या काही काळात निरमा वॉशिंग पावडरचं उत्पादन सुरू केलं आहे. मोदी हे तेजस्वी सूर्य आहेत. देशात प्रकाश मोदींमुळेच पडलाय. संध्याकाळी शीतल चांदणं मोदींमुळेच पडतं. नद्या वाहतायत, समुद्र उसळतोय तेही मोदींमुळेच होतंय. आम्ही जो श्वास घेतोय, जी हवा आहे, ती मोदींमुळेच आहे अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.