जगताप म्हणाले, ``तिकिट पिंपरी-चिंचवडला आहे, त्यामुळे मतदानाला गेलेच पाहिजे!``

लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रुग्णवाहिकेने विधान भवनात पोहचले
Laxman Jagtap
Laxman Jagtapsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : चिंचवड विधानसभेचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहिकेने पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) वरून मुंबईमध्ये विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council election) आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहचले आहेत. (Maharashtra vidhan parishad election 2022)

विधान भवनात जगताप पोहचल्यानंतर त्यांचे स्वागत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. यावेळी प्रवीण दरेकर आणि राम शिंदे उपस्थित होते. विधान परिषदेचे तिकिट भाजपने पिंपरी-चिंचवडच्या नेत्या उमा खापरे यांना दिले आहे. भाजपने पिंपरी-चिंचवडला तिकिट दिले आहे. त्यामुळे मतदानाला गेलेच पाहिजे, अशा भावना जगताप यांनी व्यक्त केल्या.

Laxman Jagtap
बावनकुळे धनंजय मुंडेंच्या कानात काय कुजबुजले? भेटीगाठींनी चर्चांना आलं उधाण

जगताप यांचे स्वागत केल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, सकाळी मला असे कळले होते की त्यांना ताप आहे. मी फोन करुन सांगितले तुम्ही येऊ नका, तुम्ही आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. मात्र, त्यानंतर १०.३० वाजता जगताप यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फोन करुन सांगितले की मी मतदानाला येणार आहे. त्यांनी घरच्यांनाही सांगितले की मी मतदानाला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवडचा त्यांना जास्त आनंद आहे. ही जी कमिटमेंट आहे, ती खुप मोठी आहे. लक्ष्मणभाऊ जनतेचे आणि जिद्दी नेते आहेत. त्यांना वाटत होते की पक्षाला आवश्यकता आहे. ती लक्षात घऊन ते या ठिकाणी आले आहेत. आम्ही नाही म्हटले असते तरी ते आले असते. यापेक्षा चांगले नेते पक्षासाठी कोण असू शकतात, अशी भावूक प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली.

Laxman Jagtap
विधानपरिषद निवडणूक : पक्षादेश पाळणं आमच्या रक्तात : मुक्ता टिळक

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील जगताप हे रुग्णवाहिकेतून मतदानाला आले होते. भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाल्यानंतर फडणवीस यांनी तो विजय जगताप आणि कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला होती. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी जगताप यांची चिंचवडला त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आभार मानले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com