Mahayuti News : प्रचंड संतापलेले केंद्रीय मंत्री थेट फडणवीसांसमोरच बसणार; आज होणार ‘सन्मानजनक’ फैसला

Mahayuti seat sharing : रामदास आठवलेंनी काल ३९ उमेदवारांची लिस्ट जाहीर केल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.
BMahayuti News
BMahayuti NewsSarkarnama
Published on
Updated on

Ramdas Athawale upset : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर युती-आघाडीमधील जागावाटपाचा संभ्रम दूर झालेला नाही. नेत्यांकडून एकला चलोचा नारा दिला असला तरी पुढील तीन दिवस तडतोडी करण्यासाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेही मागे राहणार नाहीत.

मुंबईत महायुतीच्या जागावाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाला गृहितच धरले नाही, असा आरोप काल आठवलेंनी केला होता. आपला विश्वासघात झाल्याचेही ते म्हणाले होते. पक्षाने ३९ इच्छूकांना उमेदवारी देत आपली नाराजी त्यामाध्यमातून व्यक्त केली. आपण महायुतीमध्येच असल्याचे सांगताना आठवलेंनी पक्षाची ताकद दाखवून देण्यासाठी उमेदवार उभे केल्याचेही स्पष्टपणे सांगितले.

आठवलेंनी काल ३९ उमेदवारांची लिस्ट जाहीर केल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यांनीच सोशल मीडियातून ही माहिती दिली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सकारात्मक आणि सन्मानजनक मार्ग काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे आठवले यांच्याकडून फडणवीसांसमोरच आपला संताप व्यक्त केला जाऊ शकतो.

BMahayuti News
BMC Election : मुंबईत महायुतीला मोठा झटका; निवडणुकीआधीच दोन जागा हातून गेल्या?

काय म्हणाले आठवले?

आठवले यांनी सोशल मीडियात पोस्ट करून म्हटले आहे की, काल रिपब्लिकन (आरपीआय) पक्षाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेसाठी ३० उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आमची ताकद ही आमचे समर्पित कार्यकर्ते आहेत, आणि ज्या-ज्या ठिकाणी आम्ही सक्षमपणे निवडणूक लढवू शकतो, त्या सर्व ठिकाणी विरोधकांचा पराभव निश्चित आहे, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. याच विश्वासातून ३० प्रभागांमध्ये आम्ही अर्ज दाखल केले आहेत.

आज मुख्यमंत्री महोदयांची भेट होणार असून, त्या बैठकीत काही प्रभागांबाबत सकारात्मक आणि सन्मानजनक निर्णय घेता येतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या चौकटीत राहून, पण स्वाभिमान आणि ताकदीने आपली भूमिका मांडत राहील, असेही आठवले यांनी म्हटले आहे.

BMahayuti News
BJP Politics : मुनगंटीवारांनी काडी टाकली, 'लाडक्या बहिणीं'नी धाडस दाखवत सुरूंग लावला...

दरम्यान, आठवले आणि फडणवीसांच्या आजच्या चर्चेमध्ये रिपब्लिकनच्या उमेदवारांना महायुतीतून लढण्याची संधी देण्याबाबत चर्चा होऊ शकते. आठवले यांना भाजपच्या कोट्यातून काही प्रभागांमध्ये जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. त्या प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज मागे घ्यावेत आणि रिपब्लिकनच्या उमेदवारांना महायुतीने बळ द्यावे, अशीच त्यांची मागणी असणार आहे. त्यामुळे त्यांची ही मागणी पूर्ण होणार की महायुतीविरोधात रिपब्लिकनचे उमेदवार कायम राहणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com