Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Ekanth Shinde, Devendra FadnavisSarkarnama

BMC elections : मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या जागावाटपाचा मुहूर्त ठरला; भाजप, शिंदे सेनेत होणार बैठक; अजितदादांची राष्ट्रवादी दूरच?

BJP Shinde Sena meeting News : येत्या दोन दिवसात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची बैठक होणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
Published on

Mumbai News : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे. त्यामुळे आता येत्या आठवड्यात महापलिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. येत्या आठवडाभरात निवडणुकीची घोषणा होणार असल्याने आता मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या जागावाटपाचा मुहूर्त देखील ठरला आहे. येत्या दोन दिवसात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची बैठक होणार असल्याची माहिती सूत्राने दिली. दुसरीकडे मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या जागावाटपाच्या बैठकीत सहभागी होणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

येत्या दोन दिवसातच भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीत भाजपकडून चार नेते तर शिवसेनेचे सहा नेते सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे या बैठकीत अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार की नाही याबाबतची माहिती समजू शकली नाही.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Pune BJP : भाजपकडून मुलाखतीची 'दिखावेगिरी', आधीच उमेदवार ठरले, यादी देखील तयार! इच्छुक 'गॅसवर'!

मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी भाजपकडून गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीत भाजप 150 जागा लढण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना 100 जागासाठी आग्रही आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून जोरदार रस्स्सीखेच होण्याची शक्यत आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार आहे. या नेत्यांच्या चर्चेनंतरच जागावाटपाचा निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांचे लक्ष लागले आहे.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis : कर्जमाफीबाबत CM फडणवीसांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती; फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही...

दरम्यान, दोन दिवसापूर्वी भाजप हायकमांडच्या आदेशानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर पडदा पडला. त्यानंतर शिंदे यांची शिवसेना व भाजप राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढविणार असल्याचे ठरले आहे.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Dhananjay Munde latest statement : जरांगेच्या टीकेवर धनंजय मुंडे वैतागले, म्हणाले, 'माझा त्यांच्या बांधाला बांध नाही, ते विरोधात का बोलतात? त्यांनाच विचारा'

यावेळी या दोन नेत्यांच्या बैठकीत राज्यातील आगामी 29 महानगरपालिकांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यातच मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला होता. त्यानुसार भाजप 130-140 जागा लढविणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80-90 जागा देण्यात येणार असल्याचे पुढे आले आहे. या फॉर्म्युल्यावर दोन दिवसात होत असलेल्या भाजप-शिवसेनेच्या बैठकीत एकमत होऊन शिक्कामोर्तब होणार का? याबाबत चर्चा रंगली आहे.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Pune BJP : भाजपकडून मुलाखतीची 'दिखावेगिरी', आधीच उमेदवार ठरले, यादी देखील तयार! इच्छुक 'गॅसवर'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com