BMC Khichdi Scam : शिंदे गटातील खासदाराचा मुलगा अडचणीत ? सोमय्यांच्या तक्रारीनंतर अमोल कीर्तीकरांची पाच तास चौकशी

Amol Kirtikar News : सुमारे साडेसहा कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचे सोमय्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
Amol Kirtikar News
Amol Kirtikar News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्यामध्ये शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून काल (बुधवारी) सुमारे पाच तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात दाखल झाले आहेत, तर त्यांचे सुपुत्र अमोल हे ठाकरे गटात आहेत.

Amol Kirtikar News
Womens Reservation News : स्मृती इराणींचे योगदान काय? ठाकरे गटाचा प्रश्न; मोजक्या महिलांना खासदार-आमदार केल्याने...

कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरविण्यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आर्थिक गुन्हे शाखेत केली आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्राथमिक चौकशीत‘ ईडी’ने अटक केलेले सुजित पाटकर यांचीही चौकशी केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणात अनेक जणांना चौकशीला बोलावले होते. काल (बुधवारी) अमोल यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी केली. ते चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्तालयात आले होते. कथित खिचडी घोटाळ्यामध्ये त्यांच्या सहभागाविषयी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

Amol Kirtikar News
Ganeshotsav 2023 News : 'बाप्पा'वरून राजकारण, कोल्हापुरात ठाकरे-शिंदे गटाने दंड थोपटले; नेत्यांना गणपती बाप्पा बुद्धी देवो !...

किरीट सोमय्यांनी केली होती तक्रार

२५ लाख खिचडी पॅकेट पुरविण्यासाठी पालिकेकडून आठ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळविण्यात आली आणि त्यातील चार कोटी रुपये बनावट कंपन्यांमध्ये वळविण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सुमारे साडेसहा कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचे सोमय्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

हे आहेत आरोपी...

सह्याद्री रिफ्रेशमेंट’चे राजीव साळुंखे, सुजित पाटकर, फोर्सवन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार व कर्मचारी, सुनील ऊर्फ बाळा कदम, ‘स्नेहा केटरर्स’चे भागीदार, नियोजन विभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त, अन्य बीएमसी अधिकारी, काही व्यक्तींना या प्रकरणात आरोपी आहेत. अमोल यांना चौकशीसाठी पुन्हा बोलाविण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Amol Kirtikar News
Udhayanidhi Stalin News : यालाच म्हणतात, 'सनातन धर्म'; उदयनिधी पुन्हा बरळले, संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com