Shivsena News: 'बीएमसी'च्या विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द, आता एकनाथ शिंदेंना ठाण्यात मोठा धक्का,महिला नेत्यावर पद गमावण्याची आली वेळ

Thane Mahanagar Palika News: ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 5 (अ) मधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण ऊर्फ सुलेखा शिवाजी सूर्यवंशी यांचं नगरसेवक पद रिक्त झाल्याचं महापालिका प्रशासनाने बुधवारी (ता.9 सप्टेंबर) जाहीर केले आहे.
Vishakha Raut Eknath Shinde Uddhav Thackeray.jpg
Vishakha Raut Eknath Shinde Uddhav Thackeray.jpgSarkarnama
Published on
Updated on

Thane News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. मुंबई महापालिका सभागृहात महापौर रितू तावडे यांनी विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली. नगरसेवक पद रद्द होण्यासोबतच त्यांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.यानंतर आता एकनाथ शिंदेंनाही जबर धक्का बसला आहे.

ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 5 (अ) मधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण ऊर्फ सुलेखा शिवाजी सूर्यवंशी यांचं नगरसेवक पद रिक्त झाल्याचं महापालिका प्रशासनाने बुधवारी (ता.9 सप्टेंबर) जाहीर केले आहे.

धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने 16 जून 2026 रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे त्यांचे नगरसेवक पद आपोआप संपुष्टात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एकीकडे मुंबई महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झालं होतं. त्यानंतर ठाण्यात आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे.

Vishakha Raut Eknath Shinde Uddhav Thackeray.jpg
Obc Reservation : राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' तीन जातींच्या नागरिकांना मिळणार ओबीसी प्रमाणपत्र; थेट मंत्र्याने दिल्या सूचना

ठाणे महापालिकेच्या जानेवारी 2026 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुलेखा चव्हाण या प्रभाग क्रमांक 5 (अ) मधून बिनविरोध निवडून आल्या होत्या.मात्र,त्यांच्या अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासंदर्भातील तपासणी समितीच्या निर्णयानंतर त्यांच्या नगरसेवक पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर समितीच्या 16 जून रोजीच्या आदेशाच्या आधारे महापालिका प्रशासनाने संबंधित पद रिक्त झाल्याची कार्यवाही केली आहे.

या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये 16 जून 2026 पासून प्रभाग क्रमांक 5 (अ) मधील नगरसेवक पद रिक्त झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशाखा राऊत यांनी दादर प्रभाग क्रमांक 191 मधून महिला ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. निवडणुकीनंतर प्रिया सरवणकर यांनी राऊत यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. हे प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांची नगरसेवकपदाची पात्रता रद्द झाली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com