पंतप्रधान मोदींच्या 'घर-घर' लसीकरणाच्या घोषणेला काही मिनिटांतच मुंबईत ब्रेक!

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी घरोघरी जाऊन कोरोना लसीकरण करण्याच्या मोहिमेची घोषणा केली आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : देशात कोरोनाचे (Covid-19) रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे सरकारकडून कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या मोहिमेची घोषणा केली आहे. मोदींकडून घरोघरी लसीकरण मोहिमेची घोषणा झाली असताना लगेचच मुंबई महापालिकेने (BMC) नेमकी उलट घोषणा केली आहे.

मोदींनी आज कमी लसीकरण झालेल्या देशातील 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यात महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरूणाचल प्रदेश, मेघालय आणि इतर राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. या वेळी मोदी म्हणाले की, कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी धार्मिक नेत्यांना सोबत घेऊन लोकांचे मन वळवावे. 'हर घर टीका, घर-घर टीका' हा ध्यास घेऊन घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी प्रयत्न करावेत.

Narendra Modi
आर्यनला अटक होताच राहुल गांधींनी शाहरूख खानला पाठवलेलं पत्र आलं समोर

मोदींनी घरोघरी लसीकरणाची मोठी घोषणा आज केल्यानंतर लगेचच मुंबई महापालिकेनेही एक घोषणा केली आहे. मुंबईतील कोरोना लसीकरण 4 दिवस बंद राहील, अशी घोषणा आहे. महापालिकेने म्हटले आहे की, मुंबईतील सरकारी व महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गुरुवार (ता. 4) ते रविवार (ता. 7) असे चार दिवस लसीकरण बंद राहील. सोमवारपासून (ता. ८) हे लसीकरण पूर्ववत सुरू होईल.

Narendra Modi
काँग्रेसच्या बड्या नेत्याची आधी राजकीय संन्यासाची घोषणा अन् नंतर म्हणाले...

महापालिकेकडे कोविड लशींचा पुरेसा साठा आहे. परंतु, अनेक मुंबईकर दिवाळीनिमित्त आपापल्या गावी किंवा सुटी असल्याने इतर ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे 4 दिवस लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. सोमवारपासून लसीकरण पूर्ववत सुरू होणार असून नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com