High Court News: मुंबई उच्च न्यायालयाचा एकनाथ शिंदेंना मोठा दणका, 8 आठवड्यांचा 'अल्टिमेटम'; ठाणे महापालिकेबाबत सक्तीचे आदेश

Eknath Shinde Shivsena Politics: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासाठी सुनावणी सुरु आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Thane Municipal Corporation, Eknath Shinde
Thane Municipal Corporation, Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासाठी सुनावणी सुरु आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेची धडधड वाढली आहे. आता याचदरम्यान,मुंबई उच्च न्यायालयानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका दिल्याचं समोर येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन वर्षे पूर्ण होत आले आहे. तरीही स्थायी समिती,परिवहन समिती,शिक्षण समिती यांसारख्या एकूण पाच प्रमुख समित्यांच्या सभापती आणि सदस्यांच्या निवडणुका अद्याप पार पडलेल्या नाहीत.

याच पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतील या पाच समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुका रखडल्याप्रकरणी निवडणुका मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयात ठाणे महापालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणुका आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड रखडवल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.

आता मुंबई उच्च न्यायालयानं या याचिकेवर सुनावणीवेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दणका दिला आहे. कोर्टानं शिंदेंच्या शिवसेनेला सक्तीचे आदेश काढले आहेत. पुढील 8 आठवड्यांच्या आत पाच प्रमुख पालिका समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

Thane Municipal Corporation, Eknath Shinde
Harish Salve News: विरोधकांच्या लढ्यावरच प्रश्नचिन्ह..? देशातील आंदोलनासाठी परदेशातून 'फंडिंग', नेपाळ, बांगलादेश करण्याचं षडयंंत्र; हादरवणारा आरोप

ठाणे महानगरपालिकेतील या दोन्ही प्रकरणी अॅड.सागर कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या महानगरपालिकेतील पाच प्रमुख पालिका समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुका रखडल्याप्रकरणी याचिका दाखल कऱणारी विचारणा केली होती.

मुंबई उच्च न्यायालयात याच याचिकेवर सोमवारी (ता.12 ऑक्टोबर) सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, कोर्टानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 8 आठवड्यांच्या आतच सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत.

Thane Municipal Corporation, Eknath Shinde
Gyanesh Kumar Supreme Court Case : राहुल गांधीं अन् विरोधकांच्या लढाईला मोठं यश, तर ज्ञानेश कुमारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका; विरोधातील सर्व याचिका मंजूर, सुनावणीची तारीखही ठरली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com