Bihar MP Marathi: बिहारच्या खासदारानं CM फडणवीसांशी मराठीतून साधला संवाद! नेपाळच्या प्रलयातून बचावलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना केली मदत

Bihar MP Speaking Marathi: नेपाळमध्ये आलेल्या चिखलाच्या भीषण प्रलयातून बचावलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना बिहारमधील एका खासदारानं मनोभावे मदत केली, त्यांना जेवू घातलं. यावेळी त्यांच्याशी अस्खलित मराठीत संवाद साधला.
Bihar MP Devesh Chandra Thakur
Bihar MP Devesh Chandra Thakur
Published on
Updated on

Bihar MP Speaking Marathi: नेपाळमध्ये आलेल्या चिखलाच्या भीषण प्रलयातून बचावलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना बिहारमधील एका खासदारानं मनोभावे मदत केली, त्यांना जेवू घातलं. यावेळी त्यांच्याशी अस्खलित मराठीत संवाद साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवरुन या खासदारानं मराठीतून संवाद साधला. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्रातील १०० जणांचा एक ग्रुप नेपाळमध्ये धार्मिक सहलीसाठी गेला होता. पण तिथं अचानक घडलेल्या प्रलयानंतर उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हे सर्वजण आपला बचाव करत बिहारच्या उत्तर भागात दाखल झाले. त्यानंतर इथल्या जिल्हा प्रशासनानं त्यांची राहण्या-खाण्याची सोय केली. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी नागपूरला सुखरुप पाठवून दिलं. या सर्व भाविकांची काळजी घेणारा एक व्यक्ती तिथं होता तो म्हणजे बिहारच्या सीतामढी लोकसभा मतदारसंघातील जेडीयूचे खासदार देवेशचंद्र ठाकूर. खासदार ठाकूर यांनी या भाविकांशी मराठीतूनच संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Bihar MP Devesh Chandra Thakur
Disha Salian: दिशा सालियान प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडं! गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांनी खासदार ठाकूर यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. तेव्हा त्यांच्याशी ठाकूर यांनी अस्खलित मराठीतूनच संवाद साधला. त्यांच्या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना जेडीयू खासदार ठाकूर म्हणाले, "या सर्वांना सोबत घेतलं आहे, सगळं आरामशीर आहे साहेब काहीही प्रॉब्लेम नाही त्यांना. मी बघतोय सर्व. फक्त तेवढंच एक काम लागेल आता" अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसंच पटनाहून या प्रवाशांना कुठल्या गाडीतून रवाना करत आहात त्यांचे तिकीट्स काढलेत का? अशा सूचनाही आपल्या सहकाऱ्यांना ठाकूर यावेळी देत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे.

महाराष्ट्राशी कनेक्शन

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात जन्मलेल्या ठाकूर यांचं शिक्षण महाराष्ट्रातील नाशिकच्या सैनिक स्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर उच्चशिक्षणासाठी ते पुण्याला गेले. याठिकाणी फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बीए ऑनर्स अशी पदवी घेतली. त्यानंतर पुण्याच्याच आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. पुण्यातच शिकत असताना त्यांचा विद्यार्थी राजकारणात प्रवेश झाला. त्यांनी पुणे विद्यापीठाची विद्यार्थी संघटनेची निवडणुकही लढवली होती. त्यावेळी १९७०-८० या दहा वर्षांच्या काळात पुण्यात विद्यार्थीदशेत असताना ते युथ काँग्रेसचे सदस्य होते. त्यानंतर ते १९८५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे उपाध्यक्षही झाले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे. याकाळात महाराष्ट्राशी त्यांचं घट्ट असं सामाजिक आणि राजकीय कनेक्शन जोडलं गेलं होतं. त्यानंतर त्यांनी आपला राजकीय बेस हा बिहारकडे नेला. यामुळं त्यांना बिहारचे लोक महाराष्ट्रायीन समजायचे तर महाराष्ट्रातील लोक त्यांना पक्का बिहारी समजायचे, अशी एका लेखामध्ये नोंद आहे.

Bihar MP Devesh Chandra Thakur
भारतीय सैन्यात नवा इतिहास : हवाई दलाच्या पहिल्या एअर व्हाइस-मार्शल होणाऱ्या शक्ती शर्मा कोण?

ठाकूर हे २०२४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. तत्पूर्वी त्यांनी बिहारच्या राजकारणात २००२ पासून विधानपरिषद आमदार म्हणून काम केलं आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ते बिहार विधीमंडळाचे विधानपरिषदेचे अध्यक्षही राहिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com