Ajit Pawar : अजितदादांनी मौन सोडलं ; सुळेंवर सत्तारांनी केलेल्या विधानाबाबत म्हणाले..

Ajit Pawar : मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलणार..
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी (7 नोव्हेंबर) एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली होती. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली. (Ajit Pawar latest news)

अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. परंतु विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र यावर भाष्य न केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात होते. त्यावर अजित पवार यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार बारामतीत माध्यमांशी बोलत होते.

Ajit Pawar
Draupadi Murmu : राष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्या तृणमूलच्या मंत्र्यांविरोधात भाजपनं उचललं मोठं पाऊल

सत्तार यांनी केलेल्या विधानाबाबत अजितदादांना विचारले असता ते म्हणाले, "जाणीवपूर्वक अशी बेताल व्यक्तव्य केली जात आहेत. बेताल विधान करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. काही राजकीय नेते अशी विधानं करतात, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा चुकीच्या विधानामुळे राजकारण गढूळ होत आहे, याबाबत मी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलणार आहे,"

Ajit Pawar
Jitendra Awad यांच्या जामीनानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रंगणार राजकीय नाट्य

सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया न आल्याने 'अजित पवार कुठे गेले, ते नॅाटरिचेबल आहेत,' असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते (सरकारनामा नव्हे). या वृत्तांचा समाचार अजितदादांनी दोन दिवसापूर्वी घेतला होता. ते मावळ येथे बोलत होते.

दोन दिवसापूर्वी मावळ येथे अजित पवार यांनी सांगितले की सहा महिन्यापूर्वीच मी तिकीट काढलं होते. त्यामुळे मी बाहेर होतो.मी नाराज असल्याची अफवा पसरली आहे, मी पाच दिवस आजारी होतो. कारण नसताना माझी बदनामी केली जाते. माहिती घेऊन बातम्या देत जा. फालतु बातम्या देऊ नका.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com