चांदीवाल समितीचा परमबीरसिंहांना आधी दणका अन् आता मोठा दिलासा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी समितीकडून केली जात आहे.
Param Bir Singh
Param Bir Singh Sarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी गंभीर आरोप केले आहे. या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर सोमवारी परमबीरसिंह पहिल्यांदाच हजर झाले.

परमबीरसिंह हे समितीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ करीत होते. त्यांनी वकिलांच्या मार्फतही समितीला हजर राहू शकत नसल्याची माहिती दिली होती. त्यामुळे समितीकडून त्यांना सातत्याने दंड केला जात होता. तसेच त्यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आलं होतं. त्यांना चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजावूनही ते हजर राहत नसल्याने समितीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

Param Bir Singh
पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार, पण...

अखेर सोमवारी सकाळी परमबीरसिंह समितीसमो हजर झाले. त्यानंतर समितीकडून त्यांच्याविरोधात बजावण्यात आलेले अटक वॉरंट रद्द केले आहे. त्यामुळे परमबीरसिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशमुखांवर केलेले आरोप ऐकीव माहितीच्या आधारे केल्याने समितीसमोर येण्याचा काही उपयोग नाही, अशी भूमिका त्यांच्या वकिलांनी घेतली होती. या प्रकरणी प्रतिज्ञापत्राद्वारे सविस्तर बाजू मांडण्याचीही तयारी त्यांनी दाखवली होती. आज प्रथमच ते समितीसमोर हजर राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या चौकशीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Param Bir Singh
महाराष्ट्रात अलर्ट; दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान, बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला नुकतेच चांदीवाल समितीसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी परमबीरसिंह हे समितीसमोर हजर झाले नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी समितीने परमबीरसिंह यांच्या वकिलांना त्यांचा ठावठिकाणा विचारला. यावर ते मुंबईत आहेत, अशी माहिती समितीला देण्यात आली. परमबीरसिंह यांना समितीसमोर हजर राहण्यास बजावण्यात आले होते. ते हजर न राहिल्यास त्यांच्या विरोधातील जामीनपात्र अटक वॉरंटची कार्यवाही करण्याचा इशाराही समितीने दिला होता.

मे महिन्यात वैद्यकीय सुटीवर गेलेले परमबीरसिंह हे अनेक महिने नॉट रिचेबल होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते 25 नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाले आहेत. ते चौकशीसाठी थेट गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यांची गुन्हे शाखेच्या कार्यालयात काल सलग सात तास चौकशी झाली होती. त्यानंतर आज ते ठाणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत.

परमबीरसिंहांच्या वकिलांनी नुकतीच आयोगासमोर हजेरी लावली. त्यावेळी वकील म्हणाले होते की, परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप ऐकीव माहितीवर केले होते. त्यामुळे समितीसमोर साक्षीदार म्हणून ते हजर होण्यास कोणतेही महत्व नाही. त्यांनी काही अधिकाऱ्यांकडून ऐकलेल्या माहितीच्या आधारे हे आरोप करण्यात आले होते. याबाबत परमबीरसिंहांना थेटपणे कोणतीही माहिती नव्हती. ते आयोगासमोर साक्षीदार म्हणून हजर झाले तरी कायद्यानुसार त्याला काही महत्व असणार नाही. कारण ते सांगतील ती माहिती इतरांनी त्यांना सांगितलेली असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com