Mumbai News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे. मनोज जरांगेंनी ठिकठिकाणी सभांचा धडका लावल्याने मराठा समाजही पेटून उठला आहे. याशिवाय आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मुदत दिली गेल्याने, सरकारकडूनही हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजातील तरुणांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, नरेंद्र पाटलांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीतील निर्णयांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील निर्णयांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले, ''पाच वर्षांचं कर्ज पूर्ण केलं अशी एक बॅच आहे, ही संख्या पाच हजार आहे. यापैकी एकही थकीत नाही. ही मोठी समाधानाची बाब आहे. त्यांनी पैसे घेतले व्यवसाय केला आणि परतावा दिला. परतावा देताना स्वाभाविकपणे १०० टक्के व्याजाचा परतावा सरकारने दिला.''
याशिवाय ''आतापर्यंत जे ७१ हजार ३७६ लाभार्थी आहेत, त्यांना ५८० कोटी ५९ लाख इतका व्याज परतावा दिला. त्यातील ५९ हजार ८२४ जणांना त्यांचा व्याजाचा परतावा मिळण्यास सुरुवात झाली. एकूण कर्ज वितरीत झालं ५ हजार २४० कोटी ६० लाख आहे,'' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
याचबरोबर , ''बँकांनी ७१ हजार ३७६ लाभार्थींपैकी त्यांच्या व्यवसायाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेले कर्ज ५ हजार २४० कोटी ६० लाख, ही खूप मोठी समाधानकारक आकडेवारी आहे. ज्यामध्ये इतक्या जणांनी छोटेमोठे व्यवसाय सुरू केले,'' असं या वेळी पाटील यांनी सांगितलं.
तसेच, '' शुक्रवारी झालेल्या बैठकीच्या आढाव्यानंतर दोन महत्त्वाच्या विषयावर आम्ही निर्णय घेतले. त्यातील हा १५ लाखांचा घटक मोठा झाला. पण काही जणांना साधं भाजी विकण्यासाठी, फळं विकण्यासाठी १०-२०-५० हजार, २ लाखांपर्यंतची रक्कम हवी असते, तर तोही घटक आता आपण सुरू केला,'' अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.