Chandrashekhar Bawankule Big Announcement: विधानसभेसाठी भाजपची मोठी घोषणा, महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढणार

Maharashtra BJP Political News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला.त्यामुळे विधानसभा निवडणुकांना अजून काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच भाजप जोरदार तयारीला लागला आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला.त्यामुळे विधानसभा निवडणुकांना अजून काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच भाजप जोरदार तयारीला लागला आहे. अशातच विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तगडा प्लॅन करतानाच महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गुरुवारी( ता.11) मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी भाजप राज्यात संवाद यात्रा काढणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

भाजप या संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेत जाणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत इंडिया आणि महाविकास आघाडीने केलेला खोटारडेपणा या संवादयात्रेद्वारे उघडा पाडणार आहोत असल्याची माहिती बावनकुळे यावेळी दिली.

बावनकुळे म्हणाले, पंधरा दिवसांपूर्वीच शरद पवार म्हणाले होते. महाविकास आघाडीला 155 च्यावर जागा मिळणार नाही .आणि आता तेच म्हणताहेत की, राज्यात आघाडीला 225 च्यावर जागा मिळणार आहे. लोकसभेला इंडिया आघाडीने जनतेची दिशाभूल करुन मतं घेतली.

आता जनता, आमच्या माता भगिनी त्यांना विचारताहेत, खटाखट साडे आठ हजार रुपये कुठं आहेत..? मागासवर्गीय समाजात सांगितलं की, भाजप (BJP) संविधान बदलणार आहे, मोदीजींनी तर संविधान हातात घेऊन पंतप्रधानपदाची तिसरी टर्म सुरू केली. त्यामुळे खोटेपणा एकदाच चालतो, वारंवार नाही असा घणाघातही त्यांनी इंडिया आणि महाविकास आघाडीवर यावेळी केला.

Chandrashekhar Bawankule
Jaykumar Gore News : 'कुणाचीतरी सुपारी घेऊन माणच्या स्वयंघोषित नेत्याचे आरोप; त्याने लायकीत...'; गोरे Vs देसाई वाद पेटला

भाजपने विधानसभा निवडणुकीत 170 ते 180 जागा लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीत भाजपने कोणत्याही परिस्थितीत 180 पेक्षा कमी जागा लढवू नये, अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

महायुतीच्या विधानसभेसाठीच्या जागावाटपाचा कच्चा फॉर्म्युलानुसार भाजप 170-180, शिंदे गटा 70 व आणि उर्वरित 58 जागा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांना सोडण्यात याव्या अशी मागणी भाजप नेतेमंडळी दिल्लीतील पक्षनेतृ्त्वाकडे करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar News: विधानसभेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी लागली कामाला; विदर्भात पक्ष बांधणीसाठी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com