Maharashtra Cabinet : अखेर ठरलं; कोकाटेंच्या खात्यात बदल निश्चित; अजितदादांचे लाडके दत्तामामा होणार कृषिमंत्री

Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्रीपदात बदल निश्चित होणार आहे. त्यानसार दत्तात्रेय भरणे यांचे नाव कृषिमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे भरणे यांना अखरे महत्वाचे खाते मिळणार आहे.
Manikrao Kokate-Dattatray Bharane
Manikrao Kokate-Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 31 July : पावसाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ वायरल झालेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यात बदल होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, कोकाटे यांच्या जागी इंदापूरचे आमदार तथा राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची कृषिमंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्यत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत कृषिमंत्री कोकाटे यांबाबत चर्चा केली. या चर्चेतील निष्कर्षानुसार कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले आहे. मात्र, त्यांना कृषिमंत्री पद सोडावे लागणार, हे मात्र स्पष्ट झाले आहे. कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्रीपद राज्याचे युवक कल्याण व क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे (Manikrao Kokate) यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दत्तात्रेय भरणे (Dattatrya Bharane) यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्रिपद माणिकराव कोकाटे यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठका सुरू हेात्या. त्यात कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबतही चर्चा झाली. त्यात कोकाटे यांच्याकडील संवदेनशील असलेल्या कृषी मंत्रालयाचा पदभाार काढून घेण्यावर एकमत झाले.

कृषिमंत्रालयाचा कारभार इंदापूरचे आमदार तथा राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे येण्याचे निश्चत झाल्याची माहिती आहे. कमी बोलणारा मंत्री या खात्याला आवश्यकत होता. कारण कृषिमंत्रीपद हे संवेदनशील मानले जाते. अगोदर शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाचे पडलेले बाजारभाव यामुळे शेतकरी वर्गाची नाराजी सरकारवर आहे. त्यातच कोकाटेंच्या विधानांनी त्यात पुन्हा भर टाकली, त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतृत्व कोकाटेंवर नाराज होते.

Manikrao Kokate-Dattatray Bharane
Maharashtra Political Live Updates: मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांचा मोठा निर्णय; लोकलच्या डब्यांचं डिझाईनच बदलणार

दोन दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडेबोल सुनावले होते. आतापर्यंत खूप चुका झाल्या, यापुढे माफी नाही, असेही त्यांनी खडसावले होते. त्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद जाण्याची चर्चा होती. मात्र, कोकाटेंचे मंत्रिपद वाचले असून त्यांच्या खात्यात मात्र बदल केला जाणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्रिपदाचा पदभार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे जाण्याची चर्चा दोन दिवसांपासून होती. मात्र, मकरंद पाटील यांचे नाव मागे पडून आता क्रीडामंत्री भरणे यांचे नाव कृषिमंत्रीपदासाठी पुढे आले आहे. त्यामुळे राज्याचे नवे कृषिमंत्री मकरंद पाटील आणि दत्तात्रेय भरणे होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले.

Manikrao Kokate-Dattatray Bharane
Solapur Shivsena : सोलापूरच्या शिवसेनेत मोठी घडामोड; तानाजी सावंतांच्या बंधूंचा संपर्कप्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा

माणिकराव कोकाटेंची वाद्‌ग्रस्त विधाने

  • भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाहीत, आम्ही (सरकार) एक रुपयात पिकविमा देतो

  • शेतकरी भिकारी नाही, तर सरकार भिकारी आहे (आधीची चुकीबाबत स्पष्टीकरण देताना कोकाटेंनी पुन्हा चूक केली होती)

  • कांदा काढल्यानंतर आता काय ढेकळांचा पंचनामा करायचा का?

  • पीकविम्याची रक्कम घेऊन तुम्ही मुला-मुलींचे लग्न, साखरपुडा करता. ती रक्कम शेतीत गुंतवत नाहीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com