Shivsena MLA Security : सीएम फडणवीसांचा शिंदेंना पुन्हा 'दे धक्का'? शिवसेना आमदारांच्या सुरक्षेबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

Eknath Shinde Shivsena Political News : आधी शिंदेसेनेच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात येत होती. त्यामुळे या आमदारांच्या पाठीमागं-पुढं आणि घराबाहेरही सतत पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात असायची. ही सर्व सुरक्षा आता हटवण्यात आली आहे
Eknath Shinde Shivsena .jpg
Eknath Shinde Shivsena .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु असल्याचं लपून राहिलेलं नाही. महायुतीतील प्रमुख नेत्यांनी मात्र हे कोल्ड वॉर असल्याचं सातत्यानं फेटाळून लावलं आहे. यातच आता महायुती सरकारमधून मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्रिपदासह गृहखातं ताब्यात असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला धक्का दिल्याची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या काही आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे आधीच पालकमंत्रिपद,परिवहन खात्यासंबंधी घेतल्यानंतर आता आता शिंदेंच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे सरकारमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) आमदार आणि नेत्यांना सध्या राज्य सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे. पण आता ज्या नेत्यांना सुरक्षेची आवश्यकता नाही अशा नेत्यांबाबत फडणवीसांच्या गृहखात्यानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आधीपासूनच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या नेत्यांना पुरवण्यात येत असलेल्या सुरक्षेवरुन सरकारवर टीकेची झोड उठवली जात होती. तसेच त्यांना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याची मागणी केली जात होती.

Eknath Shinde Shivsena .jpg
Vidharbha Politic's : एकनाथ शिंदेंचा मोर्चा आता विदर्भाकडे; माजी आमदारासह ठाकरेंचे अनेक शिलेदार शिंदेसेनेच्या वाटेवर!

पण आता या निर्णयामुळे मात्र महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून या निर्णयामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पण आता या निर्णयामुळे शिवसेना नेत्यांसोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

भाजप नेते रवींद्र चव्हाण,प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही. त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Eknath Shinde Shivsena .jpg
Jaykumar Gore : भाजपश्रेष्ठींनी सोलापूरला पालकमंत्री म्हणून का पाठवले? खुद्द गोरेंनीच कारण सांगितले; ‘पक्षश्रेष्ठींनी फार विचारपूर्वक पाठवलंय...’

राज्य सरकारकडून महायुतीतील भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आधी शिंदेसेनेच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात येत होती.त्यामुळे या आमदारांच्या पाठीमागं-पुढं आणि घराबाहेरही सतत पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात असायची. ही सर्व सुरक्षा आता हटवण्यात आली आहे. नव्या नियमानुसार,शिंदेंच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com