Devendra Fadnavi : लाडक्या बहि‍णींसाठी खूश खबर! व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज, CM फडणवीसांनी सगळा प्लॅन सांगितला

Devendra Fadnavis Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी मुंबई बँकेच्या मदतीने सुमारे साडे सहा हजार लाडक्या महिलांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले.
CM Devendra Fadnavi
CM Devendra Fadnavisarkarnama
Published on
Updated on

प्रकाश लिमये 

Devendra Fadnavi News : लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या विविध योजनांशी जोडून लाडक्या बहिणींना उद्योजिका बनविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यामुळे अर्थव्यवस्थेत भर पडणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाईंदर जवळील उत्तन येथे दिली.

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या  निमित्त विकसित भारत नारी शक्ती संगम या दोन दिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन शनिवारी (ता.८ ) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी मुंबई बँकेच्या मदतीने सुमारे साडे सहा हजार लाडक्या महिलांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले. त्यासाठी हमी म्हणून लाडकी बहीण योजना असून योजनेतून मिळणारे  पैसे कर्जाचे हफ्ते म्हणून भरले जाणार आहेत. त्यामुळे या साडे सहा हजार महिला केवळ लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत नाहित तर त्या आता उद्योजिका झाल्या आहेत. याच धर्तीवर सर्व लाडक्या बहिणींना आर्थिक गुंतवणूक व खर्च यासंदर्भातले प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजिका बनविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत भर पडणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

जगात जेवढे विकसित देश आहेत त्यांची वाटचाल बघितली तर या देशांना तेव्हाच विकास करता आला ज्यावेळी त्या देशातील राज्यकर्त्यांना महिला या अर्थव्यवस्थेचे दुसरे चाक आहेत हे समजले. त्यामुळे या सर्व विकसित देशांनी  त्या त्या काळात महिला केंद्रित धोरणे आखली, महिलांनी अर्थव्यवस्थेत योगदान द्यायला सुरुवात केल्यानंतर त्या देशांची  विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल झाली, असे ते म्हणाले,

CM Devendra Fadnavi
molestation case : शिक्षणक्षेत्र हादरले! अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनींना केबिनमध्ये बोलावून असभ्य वर्तन; प्राध्यापकाला अटक अन् थेट कोठडीत रवानगी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विकसित भारत या संकल्पने अंतर्गत सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक व्यवस्थेची दिशा व सर्व योजना महिला केंद्रित करण्याचे काम केले. त्याचा परिणाम म्हणून २०१४ मध्ये अकराव्या स्थानावर असलेली देशाची अर्थव्यवस्था आज ४ थया  क्रमांकावर पोहोचली आहे व लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. या सगळ्यांच्या पाठीशी महिला केंद्रित धोरणे आपल्याला पाहायला मिळतात. बेटी बाचाओ बेटी पढाओ पासून झालेली सुरुवात आज लखपती  दीदी पर्यंत येऊन पोहोचली आहे, असे देखील फडणवीस यांनी सांगितले.

33 टक्के महिला खासदार निवडून येणार

२०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ३३ टक्के महिला खासदार म्हणून निवडून जाणार आहेत. त्यामुळे  देशाची वाटचाल महिला केंद्रित लोकशाहीकडे होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महिला सक्षमपणे काम करू लागल्या असून सरपंच पती या पदाचे लवकरच  पूर्णपणे उच्चाटन झालेले पाहायला मिळेल. जबाबदारी दिली की परिवर्तन होते नेतृत्व जन्माला येत नाही. मात्र संधी मिळाली की नेतृत्व गुण तयार होतात त्यासाठी संधी मिळणे महत्त्वाचे असते असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

५० लाख लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट

महिला बचत गटाच्या माध्यमातून आज जवळपास दोन अडीच कोटी महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यातल्या  नव्वद टक्के सक्रिय आहेत व कोणत्यातरी व्यवसायाशी जोडलेल्या आहेत. राज्य सरकारच्या महामंडळाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाठी  कर्ज दिले जाते. त्यातून गेल्या दीड वर्षांच्या काळात सुमारे ३७ लाख  महिला लखपती  दीदी झाल्या असून यावर्षी ५० लाख महिलांना लखपती  दीदी बनविण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील एक कोटी महिलांना लखपती  दीदी बनवायचे आहे व त्यात महिला लोकप्रतिनिधिंची भूमिका ही सगळ्यात महत्वाची आहे. त्यांनी पुढाकार घेतला तर वेगाने हे काम  पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, सदस्या रेखाताई महाजन,  मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, पोपटराव पवार,  आदी  उपस्थित होते. या परिषदेत देशभरातील व्यवसाय, उद्योग, राजकारण आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुमारे ५०० ग्रामीण महिला सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या यशस्वी वाटचालीचे अनुभव त्यांनी परिषदेत कथन केले.

CM Devendra Fadnavi
KDMC election : कल्याण-डोंबिवलीत भाजपला रोखण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने टाकला डाव; नवी मुंबईतील बदला घेण्यासाठी मोठे प्लॅनिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com