molestation case : शिक्षणक्षेत्र हादरले! अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनींना केबिनमध्ये बोलावून असभ्य वर्तन; प्राध्यापकाला अटक अन् थेट कोठडीत रवानगी

kolhapur education crime case : कोल्हापुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली असून विद्यार्थींनीना केबिनमध्ये बोलावून एका प्राध्यापकाने असभ्य वर्तन केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर आता शिक्षणक्षेत्र हादरले असून पालकांत संतापाची लाट आहे.
molestation case
molestation casesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सांगलीतील इंदिरानगर परिसरातून बेपत्ता झालेल्या रोहित म्हैसाळे या बांधकाम कामगाराचा निघृण खून झाल्याचे उघड झाले.

  2. या प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी मुख्य आरोपी श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे याला अटक केली.

  3. मित्र शाहरूख शेखच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच रोहितचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

kolhapur crime case : कोल्हापूर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थींनीना केबिनमध्ये बोलावून तसेच फोनवरून असभ्य वर्तन करणाऱ्या प्राध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्राध्यापक सौरभ संजय जोशी (वय, ३८ रा. स्मृती अपार्टमेंट, बाबूजमाल परिसर) असे संशयिताचे नाव आहे.

पाच ते सहा विद्यार्थीनींनी त्याबाबत तक्रार दिल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

याबाबत फिर्यादीनुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी सौरभ जोशी हा महविद्यालयातील विद्यार्थींनींना वारंवार केबिनमध्ये बोलावून घ्यायचा. तसेच फोनवरून त्यांना मॅसेज करून भेटण्यासाठी बोलावत होता. तक्रारदार विद्यार्थिनीलाही त्याने नोव्हेंबर २०२५ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत वेळोवेळी फोन, मॅसेज केले. तिला केबिनमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याने तिला धक्काच बसला. याबाबत तिने थेट पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. मध्यरात्री एकच्या सुमारास गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.

molestation case
Badlapur Crime Case: बदलापूर पुन्हा एकदा हादरलं, गोरगरीब महिलांच्या अंडाशयाचीच तस्करी; 3 महिलांना ठोकल्या बेड्या

प्राध्यापकाचे निलंबन

केआयटी महाविद्यालय प्रशासनानेही तत्काळ भूमिका स्पष्ट केली आहे. संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोत्ती यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की प्राध्यापक डॉ. सौरभ जोशी यांच्या अयोग्य व अश्लील वर्तनासंदर्भात विद्यार्थिनीने दाखल केलेली तक्रार अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. या घटनेचा केआयटी प्रशासनाने तीव्र निषेध केला असून पोलिसांकडून एफआयआरची प्रत मिळताच डॉ. सौरभ जोशी याच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणाच्या तपासात पोलिस प्रशासनाला महाविद्यालयाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे. संबंधित विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच महाविद्यालयात सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण कायम राखण्यासाठी केआयटी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

molestation case
Badlapur School Crime Case : "बदलापूर प्रकरणावर भाजपच्या बहिणींचे तोंड कोणी शिवले?"

FAQs :

1. रोहित म्हैसाळे खून प्रकरणात कोणाला अटक झाली आहे?
या प्रकरणात श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.

2. रोहित म्हैसाळे कोण होते?
रोहित म्हैसाळे हे २९ वर्षांचे बांधकाम सेंट्रिंग कामगार होते.

3. खून का करण्यात आला?
मित्र शाहरूख शेखच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रोहितचा खून केल्याची आरोपीने कबुली दिली.

4. या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?
या प्रकरणाचा तपास सांगलीतील विश्रामबाग पोलीस करत आहेत.

5. ही घटना कुठे घडली?
ही घटना सांगली शहरातील इंदिरानगर परिसरात घडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com