Ashadhi Ekadashi 2022 : राज्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडे

मुख्यमंत्र्यासोबत यावेळी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य यावर्षीचे मानाचे वारकरी ठरले.
cm eknath shinde Ashadhi Ekadashi 2022
cm eknath shinde Ashadhi Ekadashi 2022sarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde)हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पंढरपुरात (pandharpur) आज आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Ekadashi 2022) विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी वारीतली विठ्ठलाची ही पहिलीच सपत्नीक महापूजा केली. (Ashadhi Ekadashi 2022 news update)

आज पहाटे 2 वाजून 55 मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. "महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाला साकडे घातले. राज्यातले सर्वच लोक सुखी आणि समृध्द होवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यानी विठ्ठलाकडे केली. शिंदे यांनी सपत्नीक लता शिंदे यांच्यासोबत महापूजा केली. मुख्यमंत्र्यासोबत यावेळी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य यावर्षीचे मानाचे वारकरी ठरले.

एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.

cm eknath shinde Ashadhi Ekadashi 2022
मुंबईची काळजी करु नका, शिवसेनेचे तुकडे होताहेत, ते पाहा ; दरेकरांनी राऊतांना सुनावलं

शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच दिल्ली गाठली. तिथे राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली. त्यानंतर हा दौरा आटोपून ते शनिवारी रात्री पुण्यात आले. तेथून रात्री लागलीच मोटारीने पंढरपुरात दाखल झाले.

ज्ञानोबा-तुकोबांचा अखंड जयघोष, पाऊस वाऱ्याची झुळूक अन् शेकडो किलोमीटर चालून आलेल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पहाटे आषाढीची विठ्ठल-रुक्मिणी महापूजा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com