CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला टोला; म्हणाले, 'गाडी पटरीवर उभीच राहत नाही, तर...'

Inauguration of railway project works : गेल्या काही वर्षांत विभिन्न परियोजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासह राज्यात सुरू आहेत. त्यामुळे त्यांनी सुरू केलेली विकासाची गाडी वेगाने सुरू आहे.
Published on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य करत विरोधकांना टोला लगावला आहे. विरोधकांची गाडी पटरीवर उभीच राहत नाही, तर मोदींची गाडी वेगाने धावत आहे, असे ते म्हणाले. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी विविध मुद्द्यांसह रेल्वे प्रकल्पाच्या कामावर भाष्य केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. गेल्या काही वर्षांत विभिन्न परियोजना पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासह राज्यात सुरू आहेत. त्यामुळे त्यांनी सुरू केलेली विकासाची गाडी वेगाने सुरू आहे, तर विरोधकांवर याबाबत टोलेबाजी करत विरोधी पक्षाची गाडी पटरीवर नीट उभीच राहत नाही, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

CM Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या दुसऱ्या यादीत तरी गडकरींचा नंबर लागणार का? आज होणार फैसला...

ते म्हणाले, भारतीय रेल्वे ही जगात एक आश्चर्य मानलं जातं. 2014 पर्यंत दिवसाला 4 किलोमीटर रेल्वे रुळचे काम होत होतं. आता मात्र 10 ते 15 किलोमीटर वेगाने काम होत आहे. रेल्वेमध्ये अनेक योजना पंतप्रधान मोदी यांनी आणल्या आहेत. त्यामध्ये वोकल फॉर लोकल वन स्टेशन वन प्रोडक्ट सुरू केले आहे. 1 हजार 300 कोटी रुपयांच्या रेल्वे योजना महाराष्ट्रात सुरू केल्या असून, यातून रोजगार उपलब्ध करून दिले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुंबई आणि महाराष्ट्रातील 56 स्टेशनचं आधुनिकरण होत आहे. लातूरमध्ये रेल्वेचं वंदे भारत ट्रेन तयार होत आहे. विकसित भारत होण्यासाठी महाराष्ट्र मोठं योगदान देत आहे.

या वेळी भाजप नेते नारायण राणे म्हणाले, गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान मोदींनी विकसित भारत व्हावा म्हणून अनेक कामे केली. 2047 पर्यंत हा संकल्प केला आहे. देशात अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामध्ये काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. जगभरात भारताची अर्थव्यवस्था 11 नंबरवरून 5 व्या नंबरवर आणण्यात मोदींनी मोठे योगदान दिले आहे. आता तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात महाराष्ट्र मोठा भागीदार होत असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

R

CM Eknath Shinde
Raigad Politics: रायगड लोकसभेत कोण भिडणार? तुल्यबळ उमेदवार कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com