कोणत्याही आदेशाची वाट बघू नका; मुख्यमंत्र्यांची कारवाईसाठी पोलिसांना पूर्ण मोकळीक

Uddhav Thackeray | : राज ठाकरेंना अटक होण्याची शक्यता
CM Uddhav Thackeray Latest News in Marathi, Raj Thackeray News
CM Uddhav Thackeray Latest News in Marathi, Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : औरंगाबाद येथील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे पालन न करण्यात आल्याने मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह आयोजकांवरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. एफआयआरमध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख प्रमुख आरोपी म्हणून केला आहे. (Raj Thackeray latest news in Marathi)

ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथील सिटी पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 116, 117, 135, 153 अ आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राज ठाकरे यांना सभेसाठी १६ अटी घालत परवानगी दिली होती. पण त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. औरंगाबाद पोलिसांनी ठाकरेंच्या भाषणाची संपू्र्ण रेकॉर्डिंग ऐकली असून "एकदाचं होवून जावू द्या" हे वाक्य ठाकरेंना भोवल्याचे सांगितले जात आहे.

CM Uddhav Thackeray Latest News in Marathi, Raj Thackeray News
मोठी बातमी : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल; 16 पैकी 12 अटींचे केलं उल्लंघन

दरम्यान, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील पोलिस प्रशासन देखील हाय अलर्ट वर आले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत अवगत केले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच यासाठी कोणत्याही आदेशाची वाट बघू नका असे म्हणतं पोलिसांना पूर्ण मोकळीक असल्याचे सांगितले आहे.

राज ठाकरे यांना या सभेला परवानगी देण्यापूर्वी औरंगाबाद पोलिसांनी एकूण १६ अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या. यात समाजिक सलोखा बिघडू नये, दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, कोणाच्याही भावना दुखावू नये, चिथावणीखोर वक्तव्य करु नये अशा अटींचा समावेश होता. मात्र राज ठाकरेंच्या या भाषणादरम्यान बहुतांश अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाले असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com