CNG Price : मुंबई आणि पुण्यातील वाहनचालकांना दिलासा; सीएनजीच्या दरात घट

CNG Price : वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे
CNG Price
CNG Pricesarkarnama
Published on
Updated on

CNG Price : मुंबई : सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सीएनजी (CNG Price) आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये (Mumbai) सीएनजीच्या दरात सहा रुपये प्रति किलो तर पीएनजीच्या दरात चार रुपये प्रति किलो कपात झाली आहे. तर पुण्यामध्ये (Pune) सीएनजीच्या दरात चार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, 2 ऑगस्ट रोजी सीएनजीच्या दरात सहा रुपयांची आणि पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्यात आली होती.

CNG Price
`मलिक आणि देशमुख यांच्यासोबत राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता जेलमध्ये बसणार`

महानगर गॅस लिमिटेडने जारी केलेल्या नव्या दरानुसार आता ग्राहकांना सीएनजी मुंबईमध्ये 80 रुपये प्रति किलोने तर पीएनजी 48. 50 रुपयांना मिळणार आहे. तर पुण्यामध्ये सीएनजी ८७ रुपये दराने मिळणार आहे. या आधी सीएनजीचे तर मुंबईमध्ये 2 ऑगस्ट रोजी वाढले होते. त्यावेळी सीएनजीच्या दरात ६ रुपयांची तर पीएनजीच्या दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

CNG Price
अन् 'लाजवा'ची मैफल अनेक वर्षांनी पुन्हा रंगली

स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्याने सीएनजीच्या दरात गेल्या महिन्यात वाढ झाली होती. त्यामुळे पुणे शहरात सीएनजीचा दर प्रतिकिलो ८५ वरून ९१ रुपये इतका झाला होता. आज झालेल्या दर कपातीमुळे पुण्यात सीएनजी आता ८७ रुपये प्रतिकीलो मिळणार आहे. घरगुती नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्याने एमएनजीएलने सीएनजीची किंमत कमी केली. एमएनजीएलने गॅसच्या किमती कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी निर्णय घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com