
Mumbai News: व्होटचोरी,मतदारयाद्यांमधील घोळ यांविरोधात एकत्र आल्यानंतर मनसेची महाविकास आघाडीतील एन्ट्री निश्चित मानली जात होती. पण एकीकडे मनसेच्या महाविकास आघाडीतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आगामी मुंबईच्या महापालिका निवडणुका लढवणार नसल्याचे संकेत काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांनी दिले आहेत. याच काँग्रेसच्या भूमिकेवर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
आता मनसे निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीसोबत आलेली मनसे आगामी स्थानिक स्वराज संस्था महाविकास आघाडीसोबत लढणार असल्याची चर्चा सुरू झाली. मुंबई महापालिका देखील ते एकत्र लढतील, असे बोलले जात होते. मात्र, काँग्रेसचे विधान परिषदेमधील आमदार भाई जगताप यांनी या चर्चांमधील हवा काढत 'राज ठाकरे सोडाच आम्ही उद्धव ठाकरेंसोबत लढणार नाही', अशी भूमिका मांडली. मी काँग्रेसचा मुंबईचा अध्यक्ष असताना ही भूमिका मांडली होती. आता देखील माझी तीच भूमिका असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी(ता.23 काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबईत काँग्रेसचा (Congress) महापौर बसेल या विधानावर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले, आम्हाला काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता. परंतु ते होऊ शकले नाही. आम्ही काँग्रेसच्या नेत्याला पंतप्रधान करण्यासाठीच इंडिया आघाडीची निर्मिती केली होती. कारण आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे होते,तेव्हा आम्ही असे म्हणालो नाही की, आम्हाला शिवसेनेचा किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान करायचा आहे, असं प्रत्युत्तर राऊत यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाला दिलं.
राऊत म्हणाले, आमचा विचार आणि आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक असून कोण काय बोलत आहे, त्यावर मी आता मत व्यक्त करणार नाही.मात्र,काँग्रेस हा आमचा महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आहे. जर काँग्रेसने तो निर्णय घेतला असेल,तर तो त्यांचा प्रश्न आहे.पण आम्हाला मुंबईत भाजपचा पराभव करायचा आहे, मुंबई अदानींपासून वाचवायची असल्याचंही राऊत यांनी म्हटलं.
संजय राऊत यांनी यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे वातावरण सध्या मुंबईत असल्याचं सांगितलं. तसेच मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे काँग्रेसने समजून घेतल पाहिजे. काँग्रेसची साथ सोडणार,असा प्रश्नच कुठे निर्माण झाला नसल्याचं स्पष्ट मतही राऊतांनी यावेळी व्यक्त केलं.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी मुंबईतील प्रत्येक समाजातील माणूस हा आमच्यासोबत असल्याचा दावाही केला. याचवेळी त्यांनी काँग्रेस दिल्लीत व देशात सर्वांत मोठा राजकीय पक्ष असून त्यात आमचे फार मोठे मत आहे. आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे आणि तुम्ही मुंबईचा महापौर करण्याच्या गोष्टी करत बसला आहात,असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.
आता मुंबईच्या महापौर पदावरुन एखादा काँग्रेस नेता काही बोलत असेल, तर त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. ते केवळ एक दिवसासाठी प्रसिद्धीसाठी केलेले वक्तव्य असू शकते. मला वाटते की, काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद नसतील, केवळ अंतर्गत वाद उफाळून आला असेल, असं खळबळजनक विधानही राऊतांनी यावेळी केलं. तुम्ही 27 महापालिकांच्या महापौरपदी काँग्रेसच्या नेत्याला बसवा. आमची काहीच हरकत नसल्याचा चिमटाही राऊतांनी यावेळी भाई जगताप यांना काढला.
काँग्रेसचे विधान परिषदेमधील आमदार भाई जगताप यांनी 'राज ठाकरे सोडाच आम्ही उद्धव ठाकरेंसोबत लढणार नाही',अशी भूमिका मांडली. मी काँग्रेसचा मुंबईचा अध्यक्ष असतानाही भूमिका मांडली होती. आता देखील माझी तीच भूमिका असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत न जाता स्वबळावर लढावे हे आपले वैयक्तिक मत आहे. निवडणूक कोणासोबत लढायची याचा निर्णय हायकमांड घेत असते. तसेच वर्षा गायकवाड यांनी देखील हायकमांड जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल असे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.