Congress news : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमधील राजकीय भांडण मिटलं; दिल्लीतून आलेल्या नेत्यांसमोरच नाव घेत केलं जाहीर...

Vijay Wadettiwar Pratibha Dhanorkar, Chandrapur Congress, Congress unity Maharashtra : मतभेद असतील, पण मनभेद नकोत. संघर्ष बाहेरच्या अन्यायाविरुद्ध असू द्या; आपसांत नाही, असेही वडेट्टीवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Pratibha Dhanorkar, Vijay Wadettiwar
Pratibha Dhanorkar, Vijay WadettiwarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Congress update : महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांचे आपआपसांतील मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. त्यामध्ये पक्षाचे नेते विजय वड्डेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील राजकीय भांडण अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहे. या मतभेदांचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यानंतरच्या निवडींमध्ये पक्षाला बसला आहे. आता हे मतभेद संपल्याचे वडेट्टीवारांनी गुरूवारी जाहीर केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी गुरूवारी मुंबईतीव प्रदेश मुख्यालय टिळक भवन येथे पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी एकप्रकारे मतभेदांची कबुली देत ते संपविण्यासाठी पहिले पाऊलही टाकले. त्याचे टिळक भवनमध्ये उपस्थित नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले.

विशेष म्हणजे म्हणजे प्रतिभा धानोरकर या स्टेजवरच बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत नाव घेऊन वडेट्टीवारांनी आपआपसांतील वाद मिटविण्याची सुरूवात चंद्रपूरपासून करूयात असे म्हटले. सरकारला बदलण्यासाठी आपल्यातील मतभेद संपवून पुढे जावे लागेल. तरच आपण सत्तेत येऊन. त्याची सुरूवात चंद्रपूरपासून होतेय. महाराष्ट्रात प्रसाद यांचे पहिले पाऊल पडतेय, त्याची चांगली सुरूवात करावी लागेल, असे वड्डेटीवार म्हणाले.

Pratibha Dhanorkar, Vijay Wadettiwar
CEO VRS news : 'SIR'चा मुद्दा पेटलेला असतानाच एका मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय; मतदार यादी प्रसिध्द होताच उचलले पाऊल

वडेट्टीवार यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्टही केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसमध्ये आपण सर्वांनी मिळून आता परस्परांमधील लढाई संपवली पाहिजे. आपली ताकद एकमेकांविरुद्ध लढण्यात नाही, तर एकजुटीने सत्याच्या आणि जनतेच्या प्रश्नांच्या लढाईला पुढे नेण्यात आहे. या एकजुटीची सुरुवात आपण चंद्रपूरपासून करूया. आपण सर्वजण एकत्र येऊया आणि इथूनच नव्या सुरुवातीला प्रारंभ करूया.

Pratibha Dhanorkar, Vijay Wadettiwar
Congress news : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा पहिला बळी ; खासदाराने सोडलं महत्वाचं पद, पक्षाला धक्का

सत्याला पुढे न्यायचं आहे, जनतेचा आवाज बुलंद करायचा आहे आणि विदर्भाला विकासाच्या मार्गावर पुढे न्यावं लागेल. त्यासाठी काँग्रेसमधील प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता आणि प्रत्येक सहकारी एकदिलाने उभा राहिला पाहिजे. मतभेद असतील, पण मनभेद नकोत. संघर्ष बाहेरच्या अन्यायाविरुद्ध असू द्या; आपसांत नाही, असेही वडेट्टीवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com