Dada Bhuse, Vijay Wadettiwar
Dada Bhuse, Vijay WadettiwarSarkarnama

Dada Bhuse : एकनाथ शिंदेंसोबत गुंड; पण भिडले दादा भुसे-विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : गुंडांना संरक्षण देण्याचे काम सरकारकडून होत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
Published on

Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत गर्दीत असतात. याआधी वर्षावर ठराविक लोकांनाच प्रवेश होता. आता सर्वसामन्य नागरिक देखील जातात. इतक्या किरकोळ गोष्टीचा बाऊ करणे बरोबर नाही. जे आरोप करीत आहेत, त्यांचे अनेक फोटो आमच्याकडे आहे. तर आम्हीही हे फोटो दाखवू का? असा शब्दात पालकमंत्री दादा भुसे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर पलटवार केला.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विविध मुद्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले. विशेषत: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुंड निलेश घायवळसोबत असलेला फोटो पोस्ट केल्यानंतर वडेट्टीवार तुटून पडले. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून, मुख्यमंत्र्यांना भेटायला गुंड येतो. गुंडांना संरक्षण देण्याचे काम सरकारकडून होत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

Dada Bhuse, Vijay Wadettiwar
Pune Criminals : 'रिल्स'ने गेलेली 'परेड'ने येणार का?; घायवळ, मारणे, बोडकेंसह गुंडांना पुणे पोलिसांनी भरला दम!

याबाबत मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गर्दीत कोणी आला असेल. मुख्यमंत्री तसेही गर्दीत असतात. याआधी वर्षावर विशिष्ठ लोकांनाच सोडण्यात येत होते. मात्र, आता सर्वसामन्य नागरिक सहजतेने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकतात. किरकोळ गोष्ट असताना तिचा बाऊ करणे बरोबर नाही. जे आरोप करतात, त्यांच्याबाबत देखील आम्हाला फोटो दाखवता येतील. गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे आम्ही समर्थन करीत नाही. त्यांच्यावर कारवाई होईल, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिकची जागा शिवसेनेचीच

नाशिक लोकसभा (Nashik) मतदार संघाची जागा शिवसेनेचीच आहे. मात्र, लोकशाहीमुळे इतरही पक्ष मागणी करू शकतात. त्यात गैर काही नाही. वरिष्ठ पातळीवर याबाबत बोलणी सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर जसा निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू होईल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Dada Bhuse, Vijay Wadettiwar
KCR Political News : केसीआर यांची पुन्हा महाराष्ट्रात एन्ट्री? बीआरएसचे नेते धोंडगे म्हणतात,'वेट अ‍ॅन्ड वाॅच...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com