Shinde Shivsena News: 'दहिसरची हिस्ट्री माहीत आहे ना?, आम्हाला त्रास दिला तर विकेट पाडू...!'

Dahisar Shivsena Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते दहिसर मोरी वालीलकर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. कंत्राटदाराने भूमिपूजन झालेल्या ठिकाणाहून काम न करता दुसऱ्याच ठिकाणी काम केले आहे.
Shivsena.jpg
Shivsena.jpgSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivali News: विधानसभा निवडणुका जशा जवळ येताहेत तसं राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी वाढू लागल्या आहेत.राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण जोरदारपणे सुरू झाले आहेत. महायुती असो वा महाविकास आघाडी दोन्ही बाजूकडून 'टफफाईट'साठी जोर लावला जात आहे.

एकीकडे महायुतीत शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने विधानसभेसाठी दबावतंत्र सुरू केल्याचे बोलले जात आहे. अशातच आता दहिसरमध्ये शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे.नवी मुंबईत समाविष्ट झालेल्या 14 गावातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आपांपसात भिडले.दहिसर वालीलकर पाडा या 300 मीटरच्या रस्त्याच्या कामांवरून हे पदाधिकारी हमरी-तुमरीवर आले.

शिंदे गटाने यावेळी विधानसभेसाठी जोर लावला आहे. दहिसर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

शिंदे गटातील उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईर व माजी कल्याण पंचायत समिती सभापती भरत काळू भोईर यांच्यात वादावादी झाली आहे. रस्ता चोरला असे म्हणत हे पदाधिकारी भिडले असून यातून ज्यांच्यात हिंमत असेल तर सामोरे या, आम्हाला त्रास दिला तर त्याची विकेट पाडू, दहिसरची हिस्ट्री माहीत आहे ना ? अशी धमकीच उपजिल्हाप्रमुख भोईरांनी माजी सभापती भोईर यांना दिली आहे.

Shivsena.jpg
Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंनी वाढविले महाआघाडीचे टेन्शन; विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय...

नवी मुंबईत समाविष्ट झालेल्या 14 गाव मधील दहिसर गावातील रस्त्याच्या कामावरून वाद निर्माण झाला आहे. दहिसर वालिलकर पाडा या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग ( पीडब्ल्यूडी) मार्फत 300 मीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले आहे.

या कामाच्या विरोधात शुक्रवारी 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. मंजूर रस्त्याचा निधी वेगळ्याच रस्त्यावर खर्च करत रस्ता करण्यात आल्याचा आरोप समिती पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते दहिसर मोरी वालीलकर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. कंत्राटदाराने भूमिपूजन झालेल्या ठिकाणाहून काम न करता दुसऱ्याच ठिकाणी काम केले आहे. ग्रामस्थांच्या सुविधेसाठी दिलेल्या रस्त्याचा निधी हा गोदाम धारकांच्या हितासाठी वापरला गेला आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील याविषयी म्हणाले, निधी मंजूर झालेला व भूमिपूजन केलेला रस्ता हा वेगळा असून कंत्राटदाराने वेगळ्याच ठिकणी काम केले आहे. कंत्राटदार व भरत कृष्णा भोईर यांच्या संगनमताने हे झालेले आहे. या रस्त्याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. पीडब्ल्यूडीचे मंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांच्या निधीतून जे काम दिलेल आहे 35 कोटीचे, त्यातीलच 88 लाखाचं हे काम आहे. ते गावात काम न करता येथील जी गोदाम परिसर आहे तिकडे काम करण्यात आले आहे.

Shivsena.jpg
Dhangar Reservation : मी काय आमदार नाही; प्रत्येकानं मर्यादा ओळखून वागलं पाहिजे; प्रशांत परिचारक असं का म्हणाले?

शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी भरत भोईर म्हणाले, 88 लाखांचा निधी हा दहिसर मोरी साठी आलेला होता. मात्र येथील उपजिल्हाप्रमुख भोईर यांनी या कंत्राटदारावर दबाव आणून त्यांनी हा रस्ता त्यांच्या गोदामासाठी करून घेतला आहे. याची चौकशी व्हावी यासाठी चव्हाण यांना पत्रव्यवहार केला असून आमच्या पक्षातील वरिष्ठांना देखील पक्षाची बदनामी होत असल्याचे कळविले आहे. त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे अशी माझी मागणी आहे असे ते म्हणाले.

याचदरम्यान, शिंदे गटातील उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईर त्याठिकाणी आले. आमच्यावर दादागिरी करणार का तुम्ही असे म्हणत त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी काहीशी झटाझटी त्यांच्यात झाली.

गावातून पदाधिकारी निघताना त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. यावेळी उपजिल्हा प्रमुख भोईर यांची माजी सभापती भोईर यांच्याशी तसेच समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासोबत झटापटी झाली. यावेळी उपजिल्हा प्रमुख भोईर यांनी 'आम्हला जो त्रास देईल त्याची आम्ही विकेट पाडू', 'हे दहिसर आहे, दहिसरची हिस्ट्री माहित आहे ना', 'एवढी हिंमत असेल तर वाघाला समोर भिडा' अशी धमकी दिली.

या झटापटी दरम्यान उपजिल्हा प्रमुख भरत भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीना देखील व्हिडीओ, फोटो काढणे बंद करा असे म्हणत दमदाटी केली. दरम्यान, हा वाद आता शिळ डायघर पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचला आहे. पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे.

Shivsena.jpg
Sanjay Ghatge: ठाकरे गटाच्या माजी आमदाराला मिळाली परतफेड; पाठिंबा दिल्याने मुश्रीफांकडून मोठं 'गिफ्ट'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com