Sanjay Gaikwad : गुन्हा दाखल होऊनही गायकवाडांची मग्रुरी कायम; आता जलिलांना धमकी, ‘तुमको तो ऐसा मारुंगा, ऐसा मारुंगा...’

Canteen Operator Beaten Case : विरोधी पक्षाकडून आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, सत्ताधारी आमदार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत होती.
Sanjay Gaikwad-Imtiaz Jaleel
Sanjay Gaikwad-Imtiaz JaleelSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 11 July : आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यानंतरही गायकवाडांची मग्रुरी अजूनही कायम आहे. कॅन्टिनचालकाच्या मारहाणीचे समर्थन करत असतानाच आता माजी खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे गायकवाडांच्या मुजोरपणाची चर्चा होत आहे.

आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मंगळवारी (ता. 08 जुलै) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) जेवायला गेले होते. त्या ठिकाणच्या डाळीला वास येत होता, तर भात शिळा होता, असा आरोप करून गायकवाड यांनी कॅन्टिनचालकाला मारहाण केली होती. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्यभरातून गायकवाड यांच्यावर टीका केली जात होती.

विरोधी पक्षाकडून आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, सत्ताधारी आमदार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चौकशीसाठी कोणी तक्रार दाखल करण्याची गरज नाही. पोलिस स्वतः चौकशी करू शकतात, असे विधान केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय गायकवाड यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिस पत्र पाठवून विधानसभा अध्यक्षांना कळविण्यात येणार आहे. व्हायरल व्हिडीओ आणि चौकशीच्या आधारे या गुन्ह्यांची नोंद केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Sanjay Gaikwad-Imtiaz Jaleel
Sanjay Gaikwad : मारकुट्या संजय गायकवाड यांना पोलिसांचा दणका; वाचवण्याचे सारे प्रयत्न 'फडणवीसांनी' एका आदेशाने उधळले!

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतरही आमदार संजय गायकवाड यांची मग्रुरी कायम आहे. कारण त्यांनी आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना धमकावले आहे. ते म्हणाले, इम्तियाज जलील म्हणतो की, मी त्या कॅन्टिन चालकाच्या जागी असतो तर त्याच्या कानाखाली.... इम्तियाज जलीलभाई, वो हॉटेल का कंत्राट तुम लेव. और फिर ये खाना खिला के दिखाव. इसको तो दोही ठोसे लगे है. तुमको तो ऐसा मारुंगा, ऐसा मारुंगा की फिरसे तू हॉटेल चलाने के लायक नही रहेगा.

Sanjay Gaikwad-Imtiaz Jaleel
Eknath Shinde Politics : श्रीकांत शिंदेंना नोटीस, एकनाथ शिंदे अमित शहांना भेटले; उदय सामंत यांनी 'त्या' दाव्यांवर स्पष्टच सांगितलं,'आम्ही दवाखाना...'

इम्तियाज जलील काय म्हणाले होते?

कॅन्टीन चालकाला मारहाण केल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केला होता. ‘मी त्या वेटरच्या जागी असतो, तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती,’ असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com