
Mumbai News : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.त्यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा हा महासोहळा गुरुवारी (ता.5) पार पडला. सीएम पदाचा पदभार स्विकारल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधी पक्षनेतेपदाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएम पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या.आणि विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं. तसेच या संवादावेळी त्यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) विरोधी पक्षनेतेपद देणार का यावर भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, येत्या 7,8,9 डिसेंबरला विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन असणार आहे.तसा प्रस्ताव राज्यपालांना पाठवला आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करु असंही त्यांनी सांगितलं. नागपुर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
तसेच विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष करत असतात, असंही त्यांनी सांगितलं. जर लोकसभेत जसं काँग्रेस पक्षाला जागा नसताना विरोधी पक्षनेतेपद दिलं तसा निर्णय अध्यक्षांनी घेतला तर त्याला आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून निश्चितच पाठिंबा देऊ,अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी जाहीर केली.
यावेळी फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केलं. लाडकी बहीण योजना सुरुच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले,महिलांना 2100 रुपये देणार आहोत.त्यासाठी बजेटमध्ये तरतूदही करणार आहोत. अधिवेशनात यावर आम्ही सकारात्मक निर्णय घेणार आहोत. निकषाबाहेर कोणी घेतलं असेल, त्याचा पुनर्विचार करु,पण जे निकषात आहेत त्या सर्वांना निश्चितच या योजनेचा लाभ मिळेल असंही फडणवीस म्हणाले.
मी शरद पवार,उद्धव ठाकरे,सुशीलकुमार शिंदे,पृथ्वीराज चव्हाण,राज ठाकरे यांना फोन केले. त्यांना निमंत्रण दिले. काही व्यक्तिगत कारणामुळं ते आले नाहीत. मात्र, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आहे. जसं उत्तर आणि दक्षिण भारतात नसतं. व्यक्तिगत संबंध राहतात. पण सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहोत असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.