Devendra Fadnavis : काल लिफ्टमध्ये भेट, आता फडणवीसांनी ठाकरेंना दिला 'हा' शब्द; म्हणाले, आम्ही जे बोललो...

Devendra Fadnavis On Maharashtra Budget Session 2024 : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज एक अतिशय प्रगतीशील आणि सर्व समावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केला."
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis-Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी महिला, युवा आणि शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. मात्र, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणाबाजी असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीतील नामुष्की विधानसभा निवडणुकीत टाळण्यासाठी अर्थसंकल्पातून मतपेरणी केल्याचंही विरोधकांनी म्हटलं. तर हा अर्थसंकल्प थापांचा असल्याची टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

ठाकरेंनी अर्थसंकल्पावर केलेल्या याच टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धवजी हा अर्थसंकल्प थापांचा नाही तर आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे. शिवाय आम्ही जे जे बोललो ते ते सर्व वेळेत पूर्ण करुन दाखवू, असा शब्दही फडणवीसांनी ठाकरेंना दिला.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Maharashtra Budget 2024 : अजितदादांचे शेतकऱ्यांसाठी 'मोठं गिफ्ट'; पूर्णपणे वीजमाफ

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात आज एक अतिशय प्रगतीशील आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केला. विशेषता शेतकरी महिला, युवा, मागासवर्गीय अशा सर्व घटकांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे. उद्धवजी हा अर्थसंकल्प थापांचा नाही तर आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे."

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Maharashtra Monsoon Session : 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठला'चा गजर करत अजित पवारांची वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा

ऐतिहासिक निर्णय घेणारा अर्थसंकल्प

तसंच हा अर्थसंकल्प ऐतिहासिक निर्णय घेणारा असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. ते म्हणाले, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय घेणारा, महिलांसाठी विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अर्थसंकल्प आहे.

विरोधी पक्षाचे लोक बोलत होते आम्ही टीव्हीवर पाहत होता. मात्र ते बोलताना त्यांच्या बोलण्यात जोर आणि चेहऱ्यावर नूर नव्हता, त्यांचा चेहरा उतरला होता. हा अर्थसंकल्प नवीन इतिहास रचणारा आहे. शिवाय आम्ही जेजे बोललो आहे, ते ते सर्व वेळेत पूर्ण करुन दाखवू, हा निवडणुकीचा नव्हे तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com