Digital Arrest Fraud : निवृत्त अधिकाऱ्याला 2 कोटी 12 लाखाला गंडा, सायबर टोळीचे उल्हासनगर कनेक्शन! जीम ट्रेनर अटकेत

Digital Arrest Scam Police : निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल दोन कोटींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. उल्हासनगरमधून सायबर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Arrest  Ravindra Jitendra Prasad Singh
Arrest Ravindra Jitendra Prasad Singh sarkarnama
Published on: 
Updated on: 

नवनीत बऱ्हाटे

Mumbai News : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला तब्बल 2 कोटी 12 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर टोळीचे उल्हासनगर कनेक्शन उघड झाले आहे. राजस्थान पोलिसांनी उल्हासनगरमधील जिम ट्रेनरच्या मुसक्या आवळल्याने खळबळ उडाली आहे. बनावट ओळख, बँक खाती आणि गुप्त आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून चालणाऱ्या या फसवणुकीचे धक्कादायक धागेदोरे आता समोर येऊ लागले आहेत.

राजस्थानमधील जयपूर येथे निवृत्त भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) अधिकाऱ्याची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल 2 कोटी 12 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थान सायबर पोलिसांनी उल्हासनगरमधील जिम ट्रेनर रविंद्र जितेंद्र प्रसाद सिंह ऊर्फ अक्षय सिंह तथा देवा याला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत विविध ठिकाणावरून सात आरोपी जेरबंद झाले आहेत.

९ ते १८ ऑगस्ट दरम्यान सायबर गुन्हेगारांनी पोलीस आणि सरकारी अधिकारी असल्याचे भासवून संबंधित निवृत्त अधिकाऱ्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. बनावट अटक वॉरंट पाठवून त्याला सतत व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडले. अटकेच्या भीतीने अधिकाऱ्याने दोन बँक खात्यांमध्ये एकूण 2 कोटी 12 लाख 10 हजार रुपये हस्तांतरित केले.

Arrest  Ravindra Jitendra Prasad Singh
Pune crime news : लॉरेन्स बिश्नोई गँगचा ‘गेम प्लॅन’ उघड! बाबा सिद्दिकी हत्येपासून खंडणीच्या गोळीबारापर्यंत थेट पुण्यात धागेदोरे

आरोपीची जयपूरला रवानगी

राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. के. सिंह यांच्या माहितीनुसार, रविंद्रची टेलिग्रामवरील ‘BRO PAY’ चॅनेलद्वारे सायबर गुन्हेगारांशी ओळख झाली होती. आर्थिक मोबदल्याच्या आमिषाने त्याने उल्हासनगरमधील कमल रेसिडेन्सी हॉटेलमध्ये अन्य आरोपी रोहित कट्कधोंड याच्या राहण्याची व्यवस्था केली होती. तसेच ‘देवा’ या बनावट नावाने स्वतंत्र सिमकार्ड वापरून बँक खात्यांची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती साथीदारांना पुरवल्याचा आरोप आहे.

त्याला मोबाईल आणि २० हजार रुपये मिळाल्याचेही तपासात समोर आले आहे. उल्हासनगरातून आरोपीला अटक केल्यानंतर त्याला ट्रान्झिट वॉरंटवर जयपूरला नेण्यात आले असून, या सायबर टोळीच्या आर्थिक व्यवहारांचा पुढील तपास राजस्थान पोलीस करत आहेत.

Arrest  Ravindra Jitendra Prasad Singh
Road Scam : रस्त्याच्या कामात घोटाळा? तीनवेळा १२ लाखांचा खर्च, 14 वर्षे आंदोलन; मात्र प्रत्यक्षात रस्ताच नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com