Pune crime news : लॉरेन्स बिश्नोई गँगचा ‘गेम प्लॅन’ उघड! बाबा सिद्दिकी हत्येपासून खंडणीच्या गोळीबारापर्यंत थेट पुण्यात धागेदोरे

Lawrence Bishnoi gang Pune connection : लॉरेन्स बिश्नोई गँगचे कथित नेटवर्क चर्चेत! बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणापासून पुण्यातील खंडणी आणि गोळीबार प्रकरणापर्यंतचे धागेदोरे जाणून घ्या.
Lawrence Bishnoi gang Pune connection
Lawrence Bishnoi gang Pune connectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : आधी धमकी, मग खंडणीची मागणी आणि गरज पडल्यास थेट गोळीबार! गुन्हेगारी टोळ्यांच्या या बदलत्या पद्धतीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव देशभरातील हायप्रोफाईल गुन्ह्यांमध्ये चर्चेत असतानाच, या टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले जाणारे पुणे कनेक्शनही वारंवार समोर आले आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी आणि फुरसुंगीतील व्यावसायिकाच्या गोदामावर झालेला गोळीबार या घटनांमुळे पुण्यातील गुन्हेगारीचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गुन्हा घडतो, पोलिस आरोपींना पकडतात; पण त्यामागचे नेटवर्क कायम आहे का? हा या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक होऊनही नव्या पंटरांचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने, केवळ गुन्हेगारांना पकडून चालणार नाही, तर त्यांना हाताशी धरणाऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Lawrence Bishnoi gang Pune connection
Sonia Gandhi : सोनिया गांधींची इन्स्टाग्रामवर एन्ट्री! पहिल्याच पोस्टमध्ये शेअर केला ‘Belonging’ आत्मचरित्राचा फर्स्ट लूक व्हॉयरल! पाहा video!

बाबा सिद्दिकी हत्येच्या तपासात पुण्याचा धागा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासात लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यासह अनेक आरोपींची नावे समोर आली. पुण्यातील वारजे परिसराशी संबंधित शुभम लोणकर याचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचा तपास यंत्रणांचा दावा होता.

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अकोला पोलिसांनी लोणकर याला अटक केली होती. त्यानंतर त्याचे बिश्नोई बंधूंशी असलेले कथित संबंध आणि सिद्दिकी हत्या प्रकरणातील त्याच्या भूमिकेची चर्चा झाली. या प्रकरणामुळे मुंबईतील हायप्रोफाईल गुन्ह्यांचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचल्याचे चित्र समोर आले.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही पुणे जिल्ह्यातील नावे

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शार्पशूटर संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सिद्धेश कांबळे ऊर्फ सौरव महाकाळ यांची नावे समोर आली होती. हे दोघे बिश्नोई टोळीच्या संपर्कात असल्याचे त्या वेळी पोलिसांनी सांगितले होते.

या प्रकरणाने स्थानिक पातळीवरील गुन्हेगारांचे देशभरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी असलेले संभाव्य संबंध चर्चेत आणले. स्थानिक आरोपींचा वापर दूरच्या राज्यांमध्ये गंभीर गुन्हे करण्यासाठी केला जात असल्यास, त्यामागील संपर्कसाखळी शोधणे तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचे ठरते.

Lawrence Bishnoi gang Pune connection
Top 10 News : 'गोकुळ'मध्ये सत्ता येऊनही पाटलांची अडचण; तर सुप्रीम कोर्टाचे आदेश, आयोगाने 100 स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबविली; वाचा महत्त्वाच्या टॉप 10 घडामोडी!

पुण्यात धमक्या, खंडणी आणि थेट गोळीबार

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावण्याच्या घटना समोर आल्या आहेत. फुरसुंगी परिसरातील एका व्यावसायिकाच्या गोदामावर धमकी देऊन गोळीबार करण्यात आल्याने या प्रकारांचे गांभीर्य वाढले.

व्यावसायिकांना आधी धमकावून दबाव निर्माण करायचा आणि त्यानंतरही मागणी मान्य झाली नाही, तर हिंसक मार्गाचा अवलंब करायचा, अशी गुन्हेगारी पद्धत स्थानिक पातळीवर चिंतेचा विषय बनली आहे. या प्रकरणांसह खंडणीच्या अनेक गुन्ह्यांत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र, नव्या पंटरांचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने या टोळ्यांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे का, हा प्रश्न कायम आहे.

पंटर बदलतात, नेटवर्क कायम राहतं?

संघटित गुन्हेगारीत प्रत्यक्ष धमकी देणारे किंवा गोळीबार करणारे आरोपी हे अनेकदा तपासातील पहिला दुवा असतात. त्यांना सूचना कोणी दिल्या, शस्त्रे कोणी पुरवली, खंडणीची रक्कम कोणापर्यंत पोहोचणार होती आणि आरोपींचे राज्याबाहेरील गुन्हेगारांशी संबंध होते का, या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय संपूर्ण नेटवर्कचा उलगडा होणे कठीण असते.

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अनेक प्रकरणांत आरोपींना अटक केली असली, तरी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक संपर्कसाखळी आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे आवश्यक आहे. सोशल मीडिया, फोन संपर्क आणि आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे विस्तारत असल्यास त्यावर लक्ष ठेवणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

पोलिसांसमोर खरी कसोटी नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्याची!

बिश्नोई टोळीचे नाव चर्चेत आलेल्या प्रत्येक गुन्ह्यात तिचा थेट सहभाग आहे, असे गृहीत धरता येणार नाही. प्रत्येक प्रकरणातील आरोपींचे संबंध आणि भूमिका तपासातूनच स्पष्ट होऊ शकतात. मात्र, पुणे जिल्ह्यातील आरोपींची नावे देशातील गंभीर गुन्ह्यांच्या तपासात समोर येणे आणि शहर परिसरात खंडणीसाठी धमक्या दिल्या जाणे, या दोन्ही बाबी पोलिसांसाठी महत्त्वाच्या आहेत

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com