Doctor Assault Case : महिला डाॅक्टरला मारहाण, खासदार श्रीकांत शिंदेंनी मौन सोडले, म्हणाले,'राजकीय संरक्षण...'

Shrikant Shinde Shivsena : या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही, असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे.
Shrikant Shinde reacts to the alleged assault on a doctor by a Shiv Sena corporator, assuring strict legal action.
Shrikant Shinde reacts to the alleged assault on a doctor by a Shiv Sena corporator, assuring strict legal action.sarkarnama
Published on
Updated on

KDMC News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मोठी राजकीय कोंडी केली आहे. या प्रकरणात शिंदेंच्या नगरसेवकाचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढे येत दोषींना कोणतेही राजकीय संरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सामाजिक माध्यमावरील आपल्या प्रतिक्रियेत डॉ. शिंदे यांनी डॉक्टरांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत रुग्णसेवा करत असून, त्यांच्यावर हात उचलणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याचबरोबर या घटनेत सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट करत, दोषी आढळल्यास त्यांच्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर या दोन्ही नात्याने आपण केडीएमसी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

Shrikant Shinde reacts to the alleged assault on a doctor by a Shiv Sena corporator, assuring strict legal action.
Narmada Water Issue Resolved : महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक निर्णय! 20 वर्षांचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी! 10 टीएमसी पाणी नर्मदेतून मिळणार

राजकीय दृष्टिकोनातून निर्णय

या घटनेमुळे शिंदे गटावर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यामुळे निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा दूर करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तत्काळ भूमिका स्पष्ट केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे केवळ कायदेशीर नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.

Shrikant Shinde reacts to the alleged assault on a doctor by a Shiv Sena corporator, assuring strict legal action.
Crime News : एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकाची महिला डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात घुसून धुडगूस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com