Dombivli Crime News : 'नगरसेवकांच्या नावाने खंडणी केली गोळा'; धक्कादायक घटना!

Dombivli Crime News Extortion collected : एका व्यक्तीला फोन लावून द्यायचे. समोरच्या व्यक्तीला फोनवर शेठ बोलत आहे. त्यांनी तुम्हाला आमच्याकडे पैसे देण्यास सांगितले असे सांगायचे.
Crime News
Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivali News : डोंबिवलीतील माजी नगरसेवकांच्या नावाने व्यावसायिकांकडून पैसे उकळन्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारी नुसार पोलिसांनी बेघाजी दबाले आणि संदीप शिंदे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. (Latest Crime News)

Crime News
MA khan : शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्ये गळती सुरु : माजी खासदाराचा राजीनामा

व्यावसायिकांकडून पैसे उकळण्याची नामी शक्कल या अट्टल दुकलीने शोधून काढली होती. फोनवर शेठ बोलतोय समोरच्या व्यक्तिला मदत करा, असे भासवून अनेक व्यावसायिकांकडून पैसे उकळण्यात येत होते. रमेश म्हात्रे यांच्यासह दिपेश म्हात्रे , विकास म्हात्रे यांच्या नावाने देखील या अट्टल दुकलीने पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Crime News
NCP Complaint : शरद पवार गटाची तक्रार; पण निवडणूक आयोग शिवसेना, भाजपवर 'ॲक्शन' घेणार का ?

डोंबिवलीत (Dombivli) उघडकीस आलेल्या एका प्रकारामुळे शिवसेना भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे . काही तरुण व्यावसायिक नागरीकांकडे जात होते. एका व्यक्तीला फोन लावून द्यायचे. समोरच्या व्यक्तीला फोनवर शेठ बोलत आहे. त्यांनी तुम्हाला आमच्याकडे पैसे देण्यास सांगितले असे सांगायचे. यांची मागणी केवळ पाचशे, हजार आणि दोन हजार रुपये असायची. प्रतिष्ठीत व्यक्ती फोन करतोय, असं समजून लोकं मदतीच्या नावाखाली पैसे देत होते.

Crime News
Nanded BJP News : नांदेडमध्ये चिखलीकरांच्या निवडणुकीची सुत्रं चव्हाणांच्या हाती..
Crime News
NCP Complaint : शरद पवार गटाची तक्रार; पण निवडणूक आयोग शिवसेना, भाजपवर 'ॲक्शन' घेणार का ?

असाच प्रकार शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या सोबत घडला. म्हात्रे यांच्या नावाने पैसे उकळण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या प्रकरणी रमेश म्हात्रे यांनी तत्काळ विष्णू नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली . या तक्रारीनुसार विष्णू नगर पोलिसांनी बेघाडी दबाले आणि त्याचा साथीदार संदीप शिंदे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला, त्यांचा शोध सुरू आहे. रमेश म्हात्रेच नाही तर दीपेश म्हात्रे आणि विकास म्हात्रे यांचा नावाचाही वापर पैसे उकळण्यासाठी केला गेल्याची माहिती समोर आली. आणखी किती जणांना या टोळीने गंडा घातलाय या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com