Shivsena UBT : "टॅरिफ बॉम्ब अन् पाकड्यांसोबत डिल; मोदींचा मित्रच भारताचा गळा कापतोय..."

India-US Trade Tension : ट्रम्प यांचा 25 टक्क्यांचा टॅरिफ बॉम्ब, त्यांनी पाकड्यांसोबत केलेले डिल, पाठोपाठ भारतीय अर्थव्यवस्थेची केलेली संभावना या सर्वच गोष्टी भारतासाठी देश म्हणून भयंकर चीड आणणाऱ्या आणि देशाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणाऱ्या आहेत.
Narendra Modi Uddhav Thackeray
Narendra Modi Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 1 Aug : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह विविध देशांवर नवे कर लादण्याचा निर्णय 1 ऑगस्टपासून अंमलात आणण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार त्यांनी आता नव्या टॅरिफ धोरणावर स्वाक्षरी केल्याचं सांगितलं जात आहे.

तर ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफवरून ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर 'अब की बार ट्रम्प सरकार' असे म्हणणारे मोदी त्यांच्यासमोर एवढे हतबल का आहेत? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

शिवाय मोदींनी लोकसभेत भारत-पाक युद्ध थांबवण्यासाठी कोणी मध्यस्ती केली नसल्याचा दावाही ट्रम्प यांनी मोडीत काढला आहे. यावरही निशाणा साधला आहे. सामनात लिहिलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या कथित मैत्रीचे वस्त्रहरण ट्रम्प रोजच करीत आहेत. या मैत्रीची पिसे ट्रम्प यांनी काढली नाहीत असा एकही दिवस उजाडत नाही.

बुधवारीही हा सिलसिला सुरूच राहिला. हिंदुस्थानातून आयात वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आणि मोदी मैत्रीचे आणखी एक पीस उपटले. ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत. तर रशियाकडून भारताने शस्त्रास्त्रे आणि कच्चे तेल खरेदी केले याचा रागही त्यांनी भारतावर ‘दंड’ आकारण्याची घोषणा करून व्यक्त केला.

एकीकडे भारतावर 25 टक्के टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्प यांनी दुसरीकडे पाकिस्तानच्या शरीफ सरकारसोबत व्यापार करार केला. पाकिस्तानातील तेलाचे साठे शोधून ते विकसित करणार असल्याची ग्वाही दिली. ‘भविष्यात कधी तरी पाकिस्तानही भारताला तेल विकेल,’ अशा शब्दांत मोदी यांच्या जखमेवर मीठ चोळले.

Narendra Modi Uddhav Thackeray
Trump Tariff Policy : ट्रम्प यांनी जे बोलले तेच केले, भारतासह 'या' 70 देशांना झटका; आजपासून नवा टॅरिफ लागू

गुरुवारी त्यांनी या जखमेला आणखी डागण्या दिल्या. रशियासोबत भारताच्या अर्थव्यवस्थेची संभावना त्यांनी ‘बुडणारी’, ‘मृत’ अर्थव्यवस्था अशा शब्दांत केली. हे दोन्ही देश आपल्या मृत अर्थव्यवस्थांना आणखी बुडवू शकतात, असा शापही देऊन टाकला. ट्रम्प यांचा 25 टक्क्यांचा टॅरिफ बॉम्ब, त्यांनी पाकड्यांसोबत केलेले डिल, पाठोपाठ भारतीय अर्थव्यवस्थेची केलेली संभावना या सर्वच गोष्टी भारतासाठी देश म्हणून भयंकर चीड आणणाऱ्या आणि देशाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणाऱ्या आहेत.

त्यामुळे मोदी सरकारकडून त्यावरून तत्काळ स्पष्ट आणि सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त होणे अपेक्षित होते. मात्र मोदींपासून शहा-जयशंकर यांच्यापर्यंत सगळ्यांची वाचा बसली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या आणखी एका ‘शॉक’मधून ते सावरलेले नाहीत. लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेला उत्तर देतानाही मोदी ट्रम्प यांचे थेट नाव घेण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बबाबतदेखील ते ना स्वतःच्या हाताची घडी मोडू शकले आहेत ना तोंडाचे कुलूप सोडवू शकले.

Narendra Modi Uddhav Thackeray
Maharashtra Politics : खातं बदललं तरी सुट्टी नाय! कोकाटेंचा व्हिडिओ दाखवणाऱ्या पवारांचे ओपन चॅलेंज, म्हणाले, सुटलो असा गैरसमज...

‘ट्रम्प यांच्या घोषणेचा गांभीर्याने अभ्यास केला जात असून राष्ट्रीय हितांची रक्षा करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. यासंदर्भात कुणाच्याही दबावाखाली झुकणार नाही,’ असे भारताने म्हणे ठणकावून सांगितले आहे. अरे, झुकणार नाही ना, मग तसे बेधडक सांगा. परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘सूत्रा’मागे का लपता? असा सवालही सामनातून उपस्थित केला आहे.

ट्रम्प ‘टॅरिफ लादून बुक्क्यांचा मार देत आहेत. तो बिनबोभाट सहन करण्याशिवाय मोदींकडे दुसरा पर्याय तरी कुठे आहे? मित्र म्हणून मोदी यांनी ट्रम्प यांच्या गळ्यात गळा घालून स्वतःला मिरवले, परंतु त्यांचा हा मित्र भारताचा गळा कापत आहे आणि ‘अब की बार ट्रम्प सरकार’ असे म्हणणारे मोदी ना ट्रम्प यांचे थेट नाव घेत आहेत ना त्यांचा टॅरिफ बॉम्ब निकामी करण्याचे धाडस दाखवत आहेत. मोदी त्यांच्यासमोर एवढे हतबल का आहेत? या प्रश्नाचे उत्तर देशातील जनतेला हवे आहे, अशा शब्दात मोदींवर सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com