राजकारण्यांचे धाबे दणाणले; अधिवेशनात एका पाठोपाठ आमदार अन् दोन मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

विधिमंडळ अधिवेशनात (Assembly Session) कोरोनाचा (Covid-19) शिरकाव झाला आहे.
Maharashtra Assembly

Maharashtra Assembly

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनात (Assembly Session) कोरोनाचा (Covid-19) शिरकाव झाला आहे. आमदार समीर मेघे, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्या नियमितपणे अधिवेशनाला हजेरी लावत होत्या. विधिमंडळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मंत्र्यांसह आमदार धास्तावले आहेत.

विधिमंडळ अधिवेशनाला लावलेले भाजपचे आमदार समीर मेघे हे सुरवातीला कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. पाडवी हेसुद्धा अधिवेशनाला उपस्थित होते. सरकारची यामुळे चिंता वाढलेली असताना आज वर्षा गायकवाड या कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनीच ट्विटरवर दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हटले आहे की, मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज समोर आले आहेत. काल सायंकाळपासून मला लक्षणे दिसून येत होती. मला सौम्य लक्षणे आहेत. माझी तब्येत बरी असून, मी सध्या विलगीकरणात आहे. मला मागील काही दिवसांत भेटलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी, अशी विनंती मी करते.

<div class="paragraphs"><p>Maharashtra Assembly</p></div>
घरात दोनशे कोटींची कॅश ठेवून जैन फिरायचे जुन्या स्कूटरवर!

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट (Third Wave) पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, अशी माहिती नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल कमिटीने केंद्र सरकारला दिली आहे. या समितीचे अध्यक्ष हे प्रा. विद्यासागर हे आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भारतात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. परंतु, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. तिसरी लाट भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला येईल. ही लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com